व्हॉटसअप चॅटमुळे आर्यनच्या अडचणीत वाढ, आर्यन खानच्या जामिनावर आज दुपारी १२ वाजता पुन्हा होणार सुनावणी

क्रूझ ड्रग्ज प्रकरणात शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याच्या जामीन अर्जावर आज दुपारी १२ च्या सुमारास पुन्हा सुनावणी होणार आहे. या प्रकरणातील तीन न्य आरोपी मोहक जायसवाल, अजित कुमार आणि नुपूर सतीजा यांच्या जामीन र्जावर २० ऑक्टोबरला सुनावणी होणार आहे.

  मुंबई : क्रूझ ड्रग्ज प्रकरणात शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याच्या जामीन अर्जावर आज दुपारी १२ च्या सुमारास पुन्हा सुनावणी होणार आहे. या प्रकरणातील तीन न्य आरोपी मोहक जायसवाल, अजित कुमार आणि नुपूर सतीजा यांच्या जामीन र्जावर २० ऑक्टोबरला सुनावणी होणार आहे.

  बुधवारी एनसीबीच्या वतीने कोर्टात आपला जबाब नोंदवला. त्यात आर्यन खानच्या जामिनाला विरोध करण्यात आला आहे. या प्रकरणातील आरोपींच्या भूमिका वेगवेगळ्या करता येत नसल्याचे एनसीबीचे म्हणणे आहे. आर्यन खानकडे कोणतेही ड्रग्ज सापडले नसले, तरी तो या कटात सामील असल्याचे एनसीबीचे म्हणणे आहे.

  पुराव्यांशी छेडछाड करु शकतो आर्यन – एनसीबी

  आर्यन खान हा प्रभावशाली व्यक्ती आहे, त्यामुळे त्याची जामिनावर सुटका झाली तर तो पुराव्यांसी छेडछाड करु शकतो, असे एनसीबीचे म्हणणे आहे. आरोपी अचित कुमार आणि शिवराज हरीजन यांनी आर्यन आणि अरबाज मर्चंट यांना चरसचा पुरवठा केल्याचे स्पष्ट असल्याचे एनसीबीने जबाबात नोंदवले आहे. आर्यन आणि अरबाज या गुन्ह्यात संबंधित असल्याचा एनसीबीचा दावा आहे.

  अवैधरित्या ड्रग्जची खरेदी-विक्री करणाऱ्या परदेशातील काही व्यक्तींच्या संपर्कात आर्यन खान असल्याचे एनसीबीचे म्हणणे आहे, याचे काही रेकॉर्डही असल्याचा एनसीबीचा दावा आहे. परदेशातील या व्यक्ती आंतरराष्ट्रीय ड्रग्ज नेटवर्कचा भाग असल्याचे एनसीबीचे म्हणणे असून, या प्रकरणात अद्याप तपास सुरु असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.

  ते तरुण आहेत, पेडलर नाहीत- शाहरुखचे वकील

  आर्यनचे वकील अमित देसाई यांनी सुनावणीत एनसीबीच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित केले आहेत. राष्ट्रीय तपास यंत्रणांनी ४ ऑक्टोबर रोजी आंतरराष्ट्रीय तस्करीचा दावा केला होता, आता १४ तारीख आली पण या काळात काहीही केले नसल्याचा आरोप वकिलांनी केला आहे. आर्यनला पार्टीला बोलविणाऱ्या प्रतिकला पोलिसांनी अटक केली नसल्याचेही वकिलांचे म्हणणे आहे. हे सर्व आरोपी तरुण आहेत, त्यांना आत्ता झालेली अटक ही त्यांच्यासाठी चांगली अद्दल आहे. हे तरुण पेडलर नसल्याचा युक्तीवादही देसाई यांनी कोर्टात केला.

  मोठ्या प्रमाणात झाली होती ड्रग्जची खरेदी

  या प्रकरणातील आरोपींच्या मोबाईलवर चॅटिंगच्या तपासावरुन, मोठ्या प्रमाणात ड्रग्ज खरेदी करण्यात आले होते, असा दावा एडिशिनल सॉलिसिटर जनरल अनिल सिंह यांनी केला आहे. हे खतरनाक ड्रग्ज असल्याचेही त्यांचें म्हणणे आहे. आर्यन याने दिलेल्या जबाबानुसार अचित कुमार हा या प्रकरणात ड्रग्ज पेडलर आहे. दोन नायजेरीयन नागरिक, शिवराज हरीजन आणि अब्दुल कादीर शेख हेही या प्रकरणात जोडले गेले असल्याचे अनिल सिंह यांचे म्हणणे आहे. आर्यन आणि अरबाज यांच्या चॅट मधून मोठ्या प्रमाणात ड्रग्ज खरेदीचा संवाद समोर आला आहे.