फार्मा मालकासाठी बीकेसीच्या पोलीस स्थानकात मध्यरात्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे नेते धाव घेतात तेव्हा…!

भाजप नेते प्रवीण दरेकर आणि प्रसाद लाड हे दमणच्या कंपनीत रेमडेसिव्हीर इंजेक्शन्स मिळवण्यासाठी आग्रही होते. त्यावेळी कंपनीने आम्हाला केंद्राची परवानगी मिळाल्यास आम्ही रेमडेसिव्हीर इंजेक्शन्सचा सर्व साठा महाराष्ट्राला द्यायला तयार आहोत, असे सांगितले. त्यानुसार केंद्र सरकारशी बोलून भाजप नेत्यांनी परवानगी घेतली होती. त्यानंतर कंपनीने काही साठा महाराष्ट्रात पाठवलाही होता. मात्र, शनिवारी दुपारी ठाकरे सरकारमधील एका मंत्र्याच्या बिशेष कार्य अधिका-यांनी ब्रुक्स फार्माचे मालक राजेश डोकानिया यांना फोन करुन धमकी दिली.

    मुंबई : काही दिवसांपूर्वी भाजप नेत्यांच्या विनंतीवरुन महाराष्ट्राला पन्नास हजार रेमडेसिव्हीर इंजेक्शन द्यायला तयार झालेल्या ब्रुक्स फार्मा कंपनीचे मालक राजेश डोकानिया यांना आधी मंत्र्याच्या कार्यालयातून धमकावण्यात आले आणि नंतर पोलिसांनी ताब्यात घेतल्याचा आरोप केला जात आहे. महाराष्ट्राला रेमडेसिव्हीर इंजेक्शन्स पुरवणाऱ्या कंपनीच्या मालकांना दमदाटी करून त्रास देणे योग्य नाही, असे म्हणत राज्याचे दोन्ही विरोधीपक्षनेते शनिवारी रात्री बीकेसी येथे पोलीस अधिका-यांना तातडीने जावून भेटले. ब्रुक्स फार्मा कंपनीने आपल्या रेमडेसिव्हीर इंजेक्शन्स ही कायद्याचे पालन करुन दिली होती. त्यासाठी केंद्र सरकारची परवानगी घेतली होती, असेही यावेळी फडणवीस यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.

    ब्रुक्स फार्माच्या मालकांसाठी धाव
    गेल्या काही दिवसांपासून भाजप नेते प्रवीण दरेकर आणि प्रसाद लाड हे दमणच्या कंपनीत रेमडेसिव्हीर इंजेक्शन्स मिळवण्यासाठी आग्रही होते. त्यावेळी कंपनीने आम्हाला केंद्राची परवानगी मिळाल्यास आम्ही रेमडेसिव्हीर इंजेक्शन्सचा सर्व साठा महाराष्ट्राला द्यायला तयार आहोत, असे सांगितले. त्यानुसार केंद्र सरकारशी बोलून भाजप नेत्यांनी परवानगी घेतली होती. त्यानंतर कंपनीने काही साठा महाराष्ट्रात पाठवलाही होता. मात्र, शनिवारी दुपारी ठाकरे सरकारमधील एका मंत्र्याच्या बिशेष कार्य अधिका-यांनी ब्रुक्स फार्माचे मालक राजेश डोकानिया यांना फोन करुन धमकी दिली. तुम्ही देवेंद्र फडणवीस आणि प्रवीण दरेकरांच्या म्हणण्यावर रेमडेसिव्हीर इंजेक्शन्स लगेच कशी दिलीत, असा सवाल त्यांनी डोकनिया यांना विचारला. त्यानंतर संध्याकाळी काही पोलीस कर्मचारी डोकनिया यांच्या घरी गेले आणि त्यांना उचलून इकडे बीकेसी पोलीस ठाण्यात   आणले. त्यामुळे मला आणि भाजपच्या नेत्यांना इतक्या तातडीने पोलीस ठाण्यात यावे लागले, असे देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांना सांगितले.

    चौकशी नंतर सोडले
    मात्र मुंबई पोलिसांनी राजेश डोकानिया यांना केवळ चौकशीसाठी ताब्यात घेतल्याचे सांगण्यात आले. डोकानिया यांच्याकडे ६० हजार रेमडेसिव्हीर इंजेक्शन्सचा साठा होता. त्यामुळे आम्ही त्यांना चौकशीसाठी बोलावले होते. चौकशी दरम्यान राजेश डोकानिया यांनी सर्व कायदेशीर कागदपत्रे दाखवल्यानंतर आम्ही त्यांना सोडून दिले, अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली. राज्यात काही दिवसांपूर्वी रेमडेसिव्हीर इंजेक्शन्सचा प्रचंड तुटवडा होता. १२ एप्रिलला भाजपचे नेते प्रसाद लाड आणि प्रवीण दरेकर यांनी थेट दमणच्या ब्रूक फार्मा कंपनीच्या कार्यालयातून ५० हजार इंजेक्शन्स खरेदी केली होती. ही सर्व इंजेक्शन्स महाराष्ट्रात गरजूनां दिला जाणार होती.