
राज ठाकरेंच्या जीवाला देशातील विघ्नसंतोषी लोकांपासून ते पाकिस्तानी दहशतवाद्यांपर्यंत धोका आहे. त्यांची सुरक्षा वाढविण्याऐवजी कमी करण्याचा घेतलेला निर्णय हा सरकारचे "खुजेपण" ठळकपणे दाखविणारा आहे, अशी टीका बाळा नांदगावकर यांनी केली आहे. बाळा नांदगावकर यांनी फेसबूकवर पोस्ट लिहून सविस्तर प्रतिक्रिया दिली आहे.
मुंबई : भाजपाच्या अनेक नेत्यांसह मनसेप्रमुखराज ठाकरे यांची सुरक्षाव्यवस्था घटवण्याचा निर्णय रविवारी राज्य सरकारने घेतला. यानंतर आता वेगवेवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत. राज ठाकरेंची सुरक्षा हटवण्याच्या निर्णयावरुन मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी महाविकास आघाडी सरकारवर जोरदार टीका केली आहे.
राज ठाकरेंच्या जीवाला देशातील विघ्नसंतोषी लोकांपासून ते पाकिस्तानी दहशतवाद्यांपर्यंत धोका आहे. त्यांची सुरक्षा वाढविण्याऐवजी कमी करण्याचा घेतलेला निर्णय हा सरकारचे “खुजेपण” ठळकपणे दाखविणारा आहे, अशी टीका बाळा नांदगावकर यांनी केली आहे. बाळा नांदगावकर यांनी फेसबूकवर पोस्ट लिहून सविस्तर प्रतिक्रिया दिली आहे.
या फेसबुक पोस्टच्या माध्यमातून नांदगावकर यांनी सरकारवर निशाणा साधत भंडारा येथील जळीतकांडाबाबतही प्रतिक्रिया दिली आहे. सरकारने ज्या नवीन लोकांना सुरक्षा देण्याचे तसेच सुरक्षा वाढविण्याचे ठरविले त्यापेक्षा तोच पैसा आरोग्य व्यवस्था विकासासाठी वापरला असता तर अतिशय चीड आणणारी भंडारा जिल्ह्यातील १० बाळांचा जीव घेणारी घटना टाळता आली असती असे त्यांनी फेसबुक पोस्टमध्ये म्हंटले आहे.
ये पब्लिक है ये सब जानती है
सरकार ने विरोधी पक्षातील नेत्यांच्या सुरक्षेत कपात केली त्यात राजसाहेब यांचे हि नाव आले….
Posted by Bala Nandgaonkar on Sunday, 10 January 2021