अंबानीच्या घराबाहेर स्फोटकं सापडली तेव्हा ATS चे अधिकारी धावाधाव करत होते आणि वाझे मात्र… तपासादरम्यान समोर आली धक्कादायक माहिती

अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटकानं भरलेली गाडी आढळल्यानंतर सर्वत्र एकच खळबळ उडाली. अँटीलियाजवळ ज्या दिवशी स्फोटकं सापडली. त्या दिवशी निलंबित पोलिस अधिकारी सचिन वाझे घटनास्थळाजवळच निवांत सॅडविच खात बसले होते अशी माहिती समोर आली आहे. घटनास्थळी दाखल झालेल्या ATS अधिकाऱ्यांनीच ही माहिती दिली आहे.

    मुंबई : मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया निवासस्थानाबाहेर 25 फेब्रुवारी रोजी अज्ञात स्कॉर्पिओ आढळून आली, तसेच येथे स्फोटकासाठी वापरण्यात येणाऱ्या जेलिटन काड्याही सापडल्याने खळबळ उडाली होती. या कारचे मालक मनसुख हिरेन यांचा मृतदेह मुंब्रा येथील रेतीबंदर खाडीत सापडल्यानंतर सचिन वाझे या प्रकरणात अडकले. रोतोरात त्यांना त्यांना अटक करण्यात आली. आता या प्रकरणात वाझेंबाबत एकापाठोपाठ एक असे अनेक खळबळजनक खुलासे होत आहेत.

    अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटकानं भरलेली गाडी आढळल्यानंतर सर्वत्र एकच खळबळ उडाली. अँटीलियाजवळ ज्या दिवशी स्फोटकं सापडली. त्या दिवशी निलंबित पोलिस अधिकारी सचिन वाझे घटनास्थळाजवळच निवांत सॅडविच खात बसले होते अशी माहिती समोर आली आहे. घटनास्थळी दाखल झालेल्या ATS अधिकाऱ्यांनीच ही माहिती दिली आहे.

    घटनेची माहिती मिळताच एटीएसचे पथक अंबानीच्या घराबाहेर दाखल झाले. या पथकातील अधिकाऱ्याने वाझेंकडे घटनेसंबंधी चौकशी केली. यावेळी या ATS अधिकाऱ्याकडे दुर्लक्ष करत वाझेंनी एका पोलिस हवालदाराला संबधीत गाडी दाखवण्याची सूचना केली. ते स्वत: मात्र निश्चिंत सँडविच खात बसले.

    वाझेंचा हा रवय्या पाहून ATS अधिकारी चिडला. त्यांनी पोलिस खात्यातील कोणताही प्रोटोकॉल न पाळल्याने या अधिकाऱ्याचा आणि वाझेंचा वादही झाला. या अधिकाऱ्याने वाझेंच्या वर्तनाची थेट वरिष्ठांकडे तक्रार केल्याची माहितीही सुत्रांकडून मिळाली आहे. दरम्यान, मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणी वादाच्या भोवऱ्यात अडकलेले सचिन वाझे यांचे पोलिस दलातून पुन्हा एकदा निलंबन करण्यात आले आहे. १७ वर्षांपूर्वीही ख्वाजा युनूस मृत्यू प्रकरणात वाझेंचे निलंबन झाले होते.