बीकेसी जंबो कोविड केअर सेंटर कधी सुरू होणार? पालिकेच्या अतिरिक्त आयुक्तांंसह बैठक

तौक्ते चक्रीवादळानंतर, पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर पालिकेने शहर आणि उपनगरातील तीन मोठ्या जंबो कोविड केंद्रांना दुरुस्तीच्या कामासाठी बंद केले होते. ही केंद्र पुन्हा 1 जूनपासून सुरू होणे अपेक्षित होते. पण काही कारणास्तव अडचणी आल्या असल्यातरीही बीकेसी जंबो कोविड केंद्र आठवड्याभरात सुरू होणार आहे. या संदर्भात सोमवारी अतिरिक्त आयुक्तांशी बैठक होणार आहे.

    मुंबई : तौक्ते चक्रीवादळानंतर, पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर पालिकेने शहर आणि उपनगरातील तीन मोठ्या जंबो कोविड केंद्रांना दुरुस्तीच्या कामासाठी बंद केले होते. ही केंद्र पुन्हा 1 जूनपासून सुरू होणे अपेक्षित होते. पण काही कारणास्तव अडचणी आल्या असल्यातरीही बीकेसी जंबो कोविड केंद्र आठवड्याभरात सुरू होणार आहे. या संदर्भात
    सोमवारी अतिरिक्त आयुक्तांशी बैठक होणार आहे.

    तौक्ते चक्रीवादळाचा धोका लक्षात घेता चक्रीवादळाच्या एक दिवस आधी बीकेसी, दहिसर आणि मुलुंड जंबो सेंटरमध्ये दाखल झालेल्या रूग्णांना इतर रुग्णालयात हलवण्यात आले होते. वादळ गेल्यानंतर या तिन्ही रुग्णालयांची दुरुस्ती करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला, जेणेकरुन इथल्या रुग्णांना पावसाळ्यात कोणत्याही प्रकारची अडचण येऊ नये. पण बीकेसी कोविड केंद्र आठवड्याभरात सुरू होणार असल्याची माहिती एका अधिकाऱ्याने दिली आहे.

    तौक्ते चक्रीवादळानंतर, पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर पालिकेने शहर आणि उपनगरातील तीन मोठ्या जंबो कोविड केंद्रांना दुरुस्तीच्या कामासाठी बंद केले होते. पण, यापैकी बीकेसी केंद्राचे दुरुस्तीचे काम पूर्ण झाले आहे. या संदर्भात सोमवारी अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांच्यासोबत बैठक होणार आहे. पण, याकारिता आम्ही पूर्ण तयारीत आहोत.

    डाॅ. राजेश ढेरे, अधिष्ठाता,बीकेसी कोविड केंद्र