सर्वसामान्यांसाठी लोकल सेवा कधी सुरू होणार? लोक उपाशी आहेत

संपूर्ण देशात लॉकडाऊन (Lockdown) जाहीर करण्यात आले आहेत. त्यामुळे अनेक जणं बेरोजगार (Unempolyment) झाले आहेत. रोजगाराच्या संधी कमी उपलब्ध आहेत. आर्थिक अडचणीत सापडलेल्या सर्वस्तरातील लोकांना उदरनिर्वाह करता यावा, यासाठी राज्य सरकारने नियोजित पद्धतीने लोकल रेल्वेसह (Local service)  सार्वजनिक वाहतूक पुन्हा सुरू करण्याचा विचार करावा, असे निर्देश उच्च न्यायालयाने मंगळवारी दिले.

मुंबई : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव (corona virus) मोठ्या प्रमाणात असल्यामुळे संपूर्ण देशात लॉकडाऊन (Lockdown) जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे अनेकजण बेरोजगार (Unempolyment) झाले आहेत. रोजगाराच्या संधी कमी उपलब्ध आहेत. आर्थिक अडचणीत सापडलेल्या सर्वस्तरातील लोकांना उदरनिर्वाह करता यावा, यासाठी राज्य सरकारने नियोजित पद्धतीने लोकल रेल्वेसह (Local service)  सार्वजनिक वाहतूक पुन्हा सुरू करण्याचा विचार करावा, असे निर्देश उच्च न्यायालयाने मंगळवारी दिले.

राज्यातील वकिलांना मुंबईतील न्यायालयांत सुनावणीला हजर राहता यावे, यासाठी लोकल प्रवासाची मुभा मिळावी, याकरिता बार कान्सिल ऑफ महाराष्ट्र् अँड गोवा या संघटनेने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्यावरील सुनावणी मुख्य न्या. दीपांकर दत्ता व न्या. गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठापुढे होती. सध्या अत्यावश्यक सेवेत येणाऱ्या कर्मचाऱ्यांना लोकलने प्रवास करण्याची मूभा आहे. सरकारने काही निर्णय घेतल्यास सर्वसामान्यांना दिलासा मिळू शकतो.

आम्ही केवळ वकिलांचा विचार करू शकत नाही. तो पक्षपात होईल. हजारो लोक उपाशी आहेत. कुणाची नोकरी गेली आहे तर कोणी भाजी विकत आहे. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुरू केल्यास अनेक लोक कामाला जाऊ शकतील. तुम्हाला (राज्य सरकार) एक सूत्र आखावे लागेल. असे न्यायाधीश म्हणाले.

१५ ऑक्टोबरच्या दरम्यान सर्वांसाठी लोकल सुरू करण्याचा विचार सरकार करत आहे, असे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी सांगितले. मुंबईतील लोकसंख्येचा विचार करता कार्यालयीन कामासाठी संपूर्ण २४ तासांचा वापर करता येईल का याची चाचपणी सुरु आहे, जेणेकरुन लोकल सेवेवर ताण येणार नाही, असे ठाकरे यांनी सांगितले.