केंद्रीय अंदाजपत्रकातील लसीकरणासाठी राखून ठेवलेले ३५ हजार कोटी रूपये कुठे गेले? माजी मुख्यमंत्री  पृथ्वीराज चव्हाण यांचा सवाल

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र सरकारचे धोरण पूर्णपणे अपयशी ठरल्याचा आरोपही चव्हाण यांनी केला आहे केंद्राने योग्य वेळी लसींना परवानगी न दिल्यामुळे सातारा जिल्ह्यात मागील १० दिवसापासून लसीकरण सेवा विस्कळीत झाली .

  मुंबई: जगभरात सर्व देश मोफत लसीकरण करत असताना भारतात केंद्र सरकार मोफत लसीकरण का करु शकत नाही? केंद्र सरकारच्या अंदाजपत्रकानुसार सरकारने लसीकरणासाठी ३५ हजार कोटीचा निधी राखून ठेवला होता. मग तो ३५ हजार कोटीचा निधी गेला कुठे? असा नेमका सवाल माजी मुख्यमंत्री आणि माजी पंतप्रधान कार्यालय मंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मोदी सरकारला विचारला आहे.

  रुग्णांचा खरा आकडा गंगा नदीत सापडला
  पृथ्वीराज चव्हाण यांनी यापूर्वीही कोरोना लसीकरणावरुन पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला होता. चव्हाण यांनी १३ मे रोजी पंतप्रधान मोदी यांचे छायाचित्र व्टिट केला आहे. त्यावर देशातील सर्वात मोठे ‘नॉन परफॉर्मिंग अॅसेट’ असे लिहिले आहे. त्याचबरोबर चव्हाण यांनी गंगा नदीत वाहून येत असलेल्या मृतदेहांवरुनही भाजपवर जोरदार टीका केली आहे. एक फोटो ट्वीट करत त्यात कोविड रुग्णांचा खरा आकडा आता गंगा नदीत सापडण्यास सुरुवात झाल्याचे व्टिट मध्ये म्हटले आहे.

  केंद्र सरकारने सर्व लस खरेदी करावी
  कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र सरकारचे धोरण पूर्णपणे अपयशी ठरल्याचा आरोपही चव्हाण यांनी केला आहे केंद्राने योग्य वेळी लसींना परवानगी न दिल्यामुळे सातारा जिल्ह्यात मागील १० दिवसापासून लसीकरण सेवा विस्कळीत झाली असल्याचे चव्हाण म्हणाले. केंद्र सरकारने सर्व लस खरेदी केली पाहिजे. राज्य सरकार किंवा खाजगी संस्थावर हि जबाबदारी ढकलू नये. अन्यथा लसीकरणासाठी खाजगी संस्था मोठी किमंत आकारु शकतात, अशी भीतीही चव्हाण यांनी व्यक्त केली आहे.