राज्यात आज कुठे कुठे पाऊस होणार?, हवामान खात्याचा अंदाज काय आहे? : जाणून घ्या एका क्लिकवर

पुढचे चार दिवस राज्यात जोरदार पाऊस हजेरी लावण्याची शक्यता आहे. राज्यात मान्सून वापसीचे संकेत मानले जात आहेत. राज्यात आजपासून पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण पट्ट्यात हळूहळू पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. दरम्यान आज रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.

    मुंबई : पुढचे चार दिवस राज्यात जोरदार पाऊस हजेरी लावण्याची शक्यता आहे. राज्यात मान्सून वापसीचे संकेत मानले जात आहेत. राज्यात आजपासून पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण पट्ट्यात हळूहळू पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे.

    दरम्यान आज रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. या दोन जिल्ह्यांत उद्या अनेक ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी तीव्र मुसळधार पावसाची शक्यता आहे. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी ऑरेज अलर्ट देण्यात आला आहे तर राज्यातील उर्वरित जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. ऑरेंज अलर्ट दिलेल्या जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे.

    रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, लातूर, परभणी, नांदेड, हिंगोली या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट तर 7 सप्टेंबर रोजी मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा, पुणे, नाशिक, औरंगाबाद, जालना या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.