‘जिथे तुम्ही ढिले आहात तिथे तुम्हालाही डिले व्हावं लागेल’ : राखी सावंत

  मुंबई : सोशल मीडियावर दररोज नवनवीन व्हिडिओज व्हायरल होत असतात. काही खूपच मजेशीर असतात तर काही खूपच हसवणारे असतात. या व्हिडिओतून विरंगुळा तर होतोच पण काही व्हिडिओ असेही असतात जे आपल्याला विचार करायला भाग पाडतात.

  राखी सावंत ही नायिका असली तरी ती खूपदा या ना त्या कारणाने सतत चर्चेत असते. या व्हिडिओच्या माध्यमातून तिने विकासाच्या मुद्द्यावरून भल्याभल्याची विकेट घेतली आहे. सगळ्यांना सध्या विकासाचे वेध लागले आहेत. सबका साथ सबका विकास असं म्हणत नेत्यांनी सर्वांना वेड लावलं आहेच पण कोरोनाने सगळ्यांचीच गोची करून ठेवलीये राव.

  कोरोना जसजसा फोफावला तसंतसं लॉकडाऊन वाढल्याने लोकांच्या घराबाहेर जाण्यावरही मर्यादा आल्या. यामुळे घराघरात होणारे वाद वाढू लागले. नवरा-बायकोच्या वादांनी टोकं गाठलं. यामुळे अनेकांच्या संसाराच मीठाचा खडा पडला आणि प्रकरणं पार कोडीमोडापर्यंत आली. काहींचा काडीमोड झालाही.

  नेत्यांना देशात विकास हवा होता पण लोकांनी घरात राहून आपला विकास साधून घेतला असं या व्हिडिओच्या माध्यमातून राखी म्हणते आहे. रेली स्प्रेचा वापर कशासाठी होतो तर कंबरेचं दुखणं, हाडं दुखणं पण तिने आणला आहे डिले स्प्रे. जिथे तुम्ही ढिले आहात तिथे तुम्ही डिले व्हाल. खासकरून तुम्हाला काडीमोडाची गरज लागणार नाही असंही राखी या व्हिडिओत म्हणते आहे.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by POP Diaries (@ipopdiaries)

   

  वास्तविक पाहता राखी सावंतने एका कॉन्डमच्या आणि स्प्रेच्या प्रमोशनसाठी हा व्हिडिओ केला आहे. हे शेवटी तिच्या हातात असलेला बॉक्स उघडल्यानंतर लक्षात येतं. ती त्यातून वेगवेगळ्या फ्लेवरचे बॉक्सेस काढून दाखवत असतानाच तिच्या हाती स्प्रे लागतो खरा पण तो स्प्रे होत नाही. हा व्हिडिओ http://www.popdiaries.com/ या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडिओ पाहून युजर्सनी मजेशीर कमेन्टही केल्या आहेत.

  आजवर या व्हिडिओला २,६४१ लोकांनी लाईकही केलं आहे. एक युजर कमेन्टमध्ये म्हणतो ही अभिनेत्री सतत बडबड करत असते. काहीही बरळत असते. एखाद्याची वैयक्तिक मदत केली असल्यास हिला पंतप्रधान करा. ‘ऐसा कहती है, क्या बकचोदी है इसकी’.