asuddin owaissi

सीबीआय न्यायालयानं दिलेला निकाल न्यायालयाच्या इतिहासातील काळा दिवस आहे. ६ डिसेंबर रोजी बाबरी मशीद जादूनं पाडण्यात आली होती का? २८ व २९ डिसेंबरच्या रात्री त्या ठिकाणी जादू करून मूर्ती ठेवण्यात आल्या होत्या का? राजीव गांधी पंतप्रधान असताना जादूनं कुलूप उघडण्यात आलं होतं का? त्यामुळेच मी म्हणतोय की, सर्वोच्च न्यायालयानं जे म्हटलं होतं, त्याच्याविरोधात हा निकाल आला आहे.

मुंबई : बाबरी विध्वंस (Babri Masjid Demolition) निकालानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि कामगार व अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांनी या निकालावर नाराजी व्यक्त केली आहे. ‘देशातील न्यायालयांकडून निर्णय येतात. त्यावरून आश्चर्य नाही. या घटनेचे सगळीकडे व्हिडिओ आहे. तरी पुरावे नाही असं न्यायालयाने म्हटले आहे. तर या निकालावर एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवेसी (Owesi’s angry reaction) यांनी देखील संताप व्यक्त केला आहे. जर मशीद ३२ जणांनी पाडली नाही, तर कुणी पाडली?, असा सवाल ओवेसी यांनी केला आहे.

सीबीआय न्यायालयानं दिलेला निकाल न्यायालयाच्या इतिहासातील काळा दिवस आहे. ६ डिसेंबर रोजी बाबरी मशीद जादूनं पाडण्यात आली होती का? २८ व २९ डिसेंबरच्या रात्री त्या ठिकाणी जादू करून मूर्ती ठेवण्यात आल्या होत्या का? राजीव गांधी पंतप्रधान असताना जादूनं कुलूप उघडण्यात आलं होतं का? त्यामुळेच मी म्हणतोय की, सर्वोच्च न्यायालयानं जे म्हटलं होतं, त्याच्याविरोधात हा निकाल आला आहे. जर तुम्ही हिंसा कराल, तर तुम्हाला मिळून जाईल, असं यातून दिसतं. अडवाणींची रथयात्रा भारतात जिथे कुठे गेली, तिथे हिंसा झाली. लोकांच्या हत्या झाल्या. संपत्ती जाळण्यात आली. अनेक कुटुंब उद्ध्वस्त झाली आणि आज न्यायालयाचा निकाल येतो की ती घटना स्वयंस्फूर्त नव्हती. मग आम्ही विचारतो की, मग स्वयंस्फूर्त असण्यासाठी किती दिवसांचा कालावधी लागतो,” असा सवाल ओवेसी यांनी उपस्थित केला.