While BJP leaders are demanding the resignation of Dhananjay Munde, Devendra Fadnavis has played a different role

बलात्काराच्या आरोपांमुळे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे अडचणीत सापडलेत. भाजपकडून त्यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे. दरम्यान माजी मुख्यमंत्री आणि विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना वेगळीच भूमिका मांडली आहे.

मुंबई : बलात्काराच्या आरोपांमुळे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे अडचणीत सापडलेत. भाजपकडून त्यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे. दरम्यान माजी मुख्यमंत्री आणि विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना वेगळीच भूमिका मांडली आहे.

बलात्काराचा आरोप करणाऱ्या महिलेची बहिण करुणासोबत परस्पर सहमतीने संबंधात दोन मुलं असल्याची कबुली धनंजय मुंडेंनी दिली आहे. मात्र, यानंतरही धनंजय मुंडे यांनी निवडणूक शपथपत्रात अपत्यांची तसंच लग्नाची माहिती लपवल्याचा आरोप होत आहे.

मुंडेंनी स्वत: आपल्या फेसबुक पोस्टमधून कबुली दिली आहे. त्यामुळे नैतिकतेच्या आधारे त्यांच्या पक्षाने त्या कबुलीच्या संदर्भातील विचार करणं गरजेचं आहे. त्यातील कायदेशीर बाबींचा विचार केला पाहिजे. एक म्हणणं त्या मुलीचं आहे, एक म्हणणं धनंजय मुंडे याचं आहे.

आपण कोर्टात गेल्याचं धनंजय मुंडे सांगत आहेत. असं संशयाचं वातावरण राहणं योग्य नाही. तात्काळ पोलिसांनी सत्य बाहेर आणलं पाहिजे,” असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.