While forming the government, the Chief Minister had said that this government would last for 25 years; Nawab Malik's criticism of Narayan Rane

आघाडी सरकार भक्कम आहे... लोकांचा विश्वास आहे... सरकारची कामगिरी लोकांना पसंत पडली आहे असे नवाब मलिक म्हणाले. नारायण राणे हे भाजपसोबत आहेत. किती व कशी वाट पहायची त्यांना माहीत आहे. त्यांच्याकडून भाजपने शिकले पाहिजे. २५ वर्ष वेळ कसा काढायचा हे नारायण राणे शिकवतील अशी खोचक टिकाही नवाब मलिक यांनी केली आहे.

    मुंबई : महाविकास आघाडी सरकार स्थापन करतानाच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हे सरकार २५ वर्ष टिकेल असे सांगितले होते त्यामुळे विरोधकांनी तोपर्यंत वाट पहावी असा टोला राष्ट्रवादीचे प्रवक्ता नवाब मलिक यांनी लगावला आहे.

    नबाब मलिक माध्यमांशी बोलताना म्हणाले की, राज्यसरकारची कोरोना काळातील कामाची प्रशंसा जगभर आणि राज्यभर होत आहे, परंतु आघाडीत वाद आहे असे वाटत असेल त्यांनी त्याचा आनंद घ्यावा.

    आघाडी सरकार भक्कम आहे… लोकांचा विश्वास आहे… सरकारची कामगिरी लोकांना पसंत पडली आहे असे नवाब मलिक म्हणाले. नारायण राणे हे भाजपसोबत आहेत. किती व कशी वाट पहायची त्यांना माहीत आहे. त्यांच्याकडून भाजपने शिकले पाहिजे. २५ वर्ष वेळ कसा काढायचा हे नारायण राणे शिकवतील अशी खोचक टिकाही नवाब मलिक यांनी केली आहे.