एनआयए कस्टडीतच सीबीआय देशमुखांवरील आरोपांची वाझेंकडे चौकशी करणार

    मुंबई : सचिन वाझेच्या एनआयए कोठडीत 9 एप्रिलपर्यंत वाढ. परमबीर सिंह यांच्या आरोपांबद्दल सचिन वाझे यांची चौकशी करण्यास सीबीआयला परवानगी. एनआयए कस्टडीतच सीबीआय देशमुखांवरील आरोपांची वाझेंकडे चौकशी करणार. वेळ सीबीआयनं एनआयएसोबत बोलून ठरवावी असे आदेश सत्र न्यायालयाने दिले आहेत.

    अनिल देशमुख यांच्यावर १०० कोटी रुपये वसुलीचे टार्गेट दिल्याचा आरोप परमबीर सिंह यांनी केला होता. मुंबई उच्च न्यायालयाने या पार्श्वभूमीवर गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावरील आरोपांची प्राथमिक चौकशी करण्याचे आदेश सीबीआयला दिले आहेत. तसेच, १५ दिवसांत चौकशी पूर्ण करण्याचाही आदेश न्यायालयाने सीबीआयला दिला आहे.

    दुसरीकडे,अँटालिया स्फोटकं आणि मनसूख हिरेन हत्याकांड प्रकरणी विनायक शिंदे आणि नरेश गोर यांना एनआयएनं न्यायालयाने २१ एप्रिल पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली. विनायक शिंदे आणि नरेश गोरची चौकशी पूर्ण, आणखीन कोठडीची गरज नसल्याचं एनआयएची न्यायालयात माहिती.