सरकारमधल्या आणखी दोन मंत्र्यांचा घोटाळा उघड करणार, सोमय्यांच्या रडारावर नक्की कोण?

भाजप नेते किरीट सोमय्या यांनी सोमवारी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांचा घोटाळा उघड करणार आहेत. स्वतः त्यांनी शनिवारी याबाबत सांगितलं. मात्र त्यांनी या दोन्ही नेत्यांची नावे उघड न केल्याने त्याविषयी तर्कवितर्क सुरू झाले आहेत.

  मुंबई : भाजप नेते किरीट सोमय्या यांनी सोमवारी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांचा घोटाळा उघड करणार आहेत. स्वतः त्यांनी शनिवारी याबाबत सांगितलं. मात्र त्यांनी या दोन्ही नेत्यांची नावे उघड न केल्याने त्याविषयी तर्कवितर्क सुरू झाले आहेत.

  सोमय्या नेमकं काय म्हणाले?

  माझ्याकडे दोन गठ्ठे आहेत. पहिल्या गठ्ठ्यात 24 हजार पाने असून त्यात ठाकरे सरकारच्या एका नेत्याचा घोटाळा आहे. दुसरा जो गठ्ठा आहे त्यात चार हजार पाने आहेत. तो शरद पवार यांच्या एका मंत्र्याच्या घोटाळ्याचा असल्याचं सोमय्यांनी सांगितलं.

  दरम्यान या घोटाळ्याबाबत देवेंद्र फडणवीस दिल्लीत चर्चा करणार असल्याचंही ते म्हणाले. फडणवीसांनी मला मोकळीक दिलेली आहे. सोमवारी ही नावे मी उघड करणार असल्याचं सोमय्या म्हणाले.

  भुजबळांचं सोमय्यांना प्रत्त्युत्तर

  किरीट सोमय्यांनी महाविकास आघाडी सरकार आणखी अडचणीत येईल असे वक्तव्य केल्यानंतर राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी किरीट सोमय्यांना प्रत्त्युत्तर दिलं आहे.

  भुजबळ म्हणाले, काही लोकांना हेच काम दिले असतील तर त्याला काय करणार. मात्र पहिले अपने आचल मे झांककर देखो..फिर दुसरे के उपर पथथर मारणे चाहिए… सरकार अडचणीत येणार नाही सर्वात मोठे कोर्ट जनता आहे.