‘आता नेमके कोण दिशाभूल करते आहे.. ‘ शरद पवारांच्या पत्रकार परिषदेनंतर  फडणवीसांनी पुराव्यासह केले  ट्विट

' १५ ते २७ फेब्रुवारी या कालावधीत अनिल देशमुख होम क्वारंटाईन होते, असे पवार साहेब सांगतात. पण, १५ ला सुरक्षारक्षकांसह, समोर माध्यम प्रतिनिधी समोर अशी पत्रकार परिषद मात्र झाली होती. हे नेमके कोण?-

    मुंबई: राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवारांनी (Sharad Pawa)दिल्लीमध्ये पत्रकार परिषद घेऊन परमबीर सिंग( Parambir Singh) यांच्या पत्रावर प्रश्न उपस्थित करत गृहमंत्री अनिल देशमुख यांची पाठराखण देखील केली आहे. “ज्या दिवसांचा परमबीर सिंग यांनी पत्रात उल्लेख केला आहे, त्या काळात अनिल देशमुख करोनामुळे रुग्णालयात होते. मग सचिन वाझे देशमुखांना कधी भेटले?”, असा आक्षेप शरद पवार यांनी घेतला आहे. मात्र शरद पवारांच्या या प्रतिक्रियेनंतर माजी मुख्यमंत्री व विरोध पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करत ‘ १५ ते २७ फेब्रुवारी या कालावधीत अनिल देशमुख होम क्वारंटाईन होते, असे पवार साहेब सांगतात. पण, १५ ला सुरक्षारक्षकांसह, समोर माध्यम प्रतिनिधी समोर अशी पत्रकार परिषद मात्र झाली होती. हे नेमके कोण? असे सांगत अनिल देशमुखांच्या पत्रकार परिषदेच ट्विट शेअर केले आहे.

    म्हणजेच ‘ परमवीर सिंग यांच्या पत्रावर शरद पवार यांना पुरेशी माहिती देण्यात आलेली नाही, असे स्पष्टपणे दिसून येते.
    या पत्रात नमूद केलेला ‘एसएमएस’चा पुरावाच सांगतो की, ही भेट फेब्रुवारीच्या अखेरीस झालेली आहे.

    आता नेमके कोण दिशाभूल करते आहे? असे पुराव्यासह दुसरे ट्विट देवेंद्र फडणवीस यांनी केले केले आहे.