पाच वर्ष मुख्यमंत्री कोण? नाना पटोले म्हणाले…

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले सध्या विदर्भ दौऱ्यावर आहेत. त्यांनी महाविकास आघाडी, येत्या काळातील निवडणुका आणि मुख्यमंत्रिपदाबाबत रोखठोक भाष्य केले. दौऱ्यावर असताना स्वबळाचा नारा दिला होता. तसेच केवळ स्थानिक स्वराज्य संस्थाच नव्हे तर विधानसभा निवडणूकही स्वबळावर लढणार असल्याचे म्हणाले होते. इतकेच नाही तर मुख्यमंत्री व्हायला आवडेल असेही त्यांनी बोलून दाखविले होते. आता या सर्वांवर नाना पटोले यांनी स्पष्टीकरण दिले.

  मुंबई : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले सध्या विदर्भ दौऱ्यावर आहेत. त्यांनी महाविकास आघाडी, येत्या काळातील निवडणुका आणि मुख्यमंत्रिपदाबाबत रोखठोक भाष्य केले. दौऱ्यावर असताना स्वबळाचा नारा दिला होता. तसेच केवळ स्थानिक स्वराज्य संस्थाच नव्हे तर विधानसभा निवडणूकही स्वबळावर लढणार असल्याचे म्हणाले होते. इतकेच नाही तर मुख्यमंत्री व्हायला आवडेल असेही त्यांनी बोलून दाखविले होते. आता या सर्वांवर नाना पटोले यांनी स्पष्टीकरण दिले.

  पाच वर्ष मुख्यमंत्री कोण? असा प्रश्न विचारण्यात आलयानंतर पाच वर्षे उद्धव ठाकरे हेच मुख्यमंत्री राहतील, असे नाना पटोले यांनी स्पष्ट सांगितले. मुख्यमंत्रिपदाबाबत कोणताही फॉर्म्युला ठरलेला नाही. पाच वर्ष उद्धव ठाकरे हेच मुख्यमंत्री राहतील, त्यांना काँग्रेसचा पूर्ण पाठिंबा आहे, असे नाना पटोले म्हणाले.

  नाना पटोले म्हणाले की, पंतप्रधान मोदींच्या ‘मन की बात’मध्ये उल्लेख केलेला अकोल्यातील एका ढाबेवाल्याने काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यानंतर त्याने शेतकऱ्यांचा प्रतिनिधी मुख्यमंत्री म्हणून बघायचा असल्याचे सांगितले. त्याला उत्तर देताना, त्यासाठी काँग्रेस आमदार निवडून दिले पाहिजेत. काँग्रेस हायकमांड ठरवेल कोण मुख्यमंत्री?, असे उत्तर दिल्याचे नानांनी सांगितले.

  महत्त्वाकांक्षा प्रत्येकाला असते. पण शेवटी पक्षाचे मोठे निर्णय हे त्या पक्षाचे प्रमुख घेत असतात. एखाद्या निवडणुकीत आघाडी करायची की स्वबळावर लढायचे हा निर्णय घेण्याचा अधिकार काँग्रेसमध्ये सोनिया गांधी यांचा आहे.

  - अजित पवार, उपमुख्यमंत्री
  हे सुद्धा वाचा