Kirit Somaiya on Baramati tour again; New allegations against Deputy Chief Minister Ajit Pawar?

राज्याचे उपमुख्यमंत्री अजीत पवार(Ajit Pawar) यांच्याशी संबंधित संस्थावर आयकर आणि ईडीचे छापे पडले असतानाच भाजप नेते किरीट सोमय्या(Kirit Somaiya) यानी मुंबईत पत्रकार परिषद घेत नवे आरोप केले आहेत. सोमैय्या यानी सवाल केला आहे की, जरंडेश्वर साखर कारखान्याचा(Jarandeshwar Sugar Factory) मालक, चालक आणि लाभार्थी कोण आहे? याचे अजित पवारांनी उत्तर द्यावे. ओमकार बिल्डरने जरंडेश्वर साखर कारखान्याला लिजवर दिला होता. अजित पवार त्यांना दरवर्षी किती भाडे देतात हे देखील स्पष्ट करावे. अजित पवार आणि ओमकार बिल्डरचे संबंध काय? यावर शरद पवार आणि अजित पवार का बोलत नाहीत?

  मुंबई  : राज्याचे उपमुख्यमंत्री अजीत पवार(Ajit Pawar) यांच्याशी संबंधित संस्थावर आयकर आणि ईडीचे छापे पडले असतानाच भाजप नेते किरीट सोमय्या(Kirit Somaiya) यानी मुंबईत पत्रकार परिषद घेत नवे आरोप केले आहेत. सोमैय्या यानी सवाल केला आहे की, जरंडेश्वर साखर कारखान्याचा(Jarandeshwar Sugar Factory) मालक, चालक आणि लाभार्थी कोण आहे? याचे अजित पवारांनी उत्तर द्यावे. ओमकार बिल्डरने जरंडेश्वर साखर कारखान्याला लिजवर दिला होता. अजित पवार त्यांना दरवर्षी किती भाडे देतात हे देखील स्पष्ट करावे. अजित पवार आणि ओमकार बिल्डरचे संबंध काय? यावर शरद पवार आणि अजित पवार का बोलत नाहीत?

  कारखान्याचा मालक कोण हा प्रश्न

  पत्रकार परिषदेत सोमैय्या म्हणाले की, २७ हजार शेतकऱ्यांनी हा कारखाना उभा केला. त्यांना मी भेटलो त्यांना देखील या कारखान्याचा मालक कोण हा प्रश्न पडला आहे. यावेळी अजीत पवार यांच्यावरील छापेमारीबाबत प्रतिक्रिया देताना सोमैय्या म्हणाले की, पवारसाहेब राजकारण सोडून अर्थकारणावर बोला ना.

  खरे मालक लाभार्थी अजित पवारांना माहिती

  सोमैय्या म्हणाले की, महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेवर त्यांचे सरकार होते. त्यावेळी त्यांनी किती कारखाने घेतले. कारखान्यात किती शेतकरी भागधारक होते? जरंडेश्वर साखर कारखान्याचा सातबारा काढण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी मालकीची व्याप्ती पुढे पुढे जात आहे. खरे मालक चालक लाभार्थी हे अजित पवारांना माहिती आहे. ते का घोषित करत नाही. प्रश्न एकाच साखर कारखान्याचा नाही. असेही किरीट सोमय्या म्हणाले.

  पवारांनी कारखाना बेनामी पद्धतीने घेतला

  मुंबई उच्च न्यायालयाने कारखान्याच्या चौकशीचे स्पष्ट निर्देश दिले आहेत. त्याची चौकशी दाबण्याचा ठाकरे सरकार प्रयत्न करत आहे. अजित पवारांनी हा साखर कारखाना बेनामी पद्धतीने घेतला. जरंडेश्वर कारखान्याकडे लक्ष का? असे म्हणत अजित पवार साताऱ्यात गेले होते. पण, माझा कारखाना असे ते सांगत नाहीत. रेकॉर्डमध्ये जरंडेश्वर साखर कारखान्याचा मालक तुरुंगात आहे. पण, खरा मालक बाहेर आहे. हा कारखाना गुरू कमोडिटी ओमकार बिल्डरने जरंडेश्वर साखर कारखान्याला लिजवर दिला होता. अजित पवार त्यांना दरवर्षी किती भाडे देतात हे देखील स्पष्ट करावे. अजित पवार आणि ओमकार बिल्डरचे संबंध काय? यावर शरद पवार आणि अजित पवार का बोलत नाहीत? त्यांची वकिली का करतात. ओमकार बिल्डरला कारखाना विकत घेण्यासाठी पैसे कोणी दिले? असे अनेक सवाल किरीट सोमय्या यांनी उपस्थित केले.