To run Thackeray's birth party; They were not born to run the state; BJP leader's harsh criticism

मुंबई : टीकेचा सामना करावा लागेल असे म्हणत उच्च न्यायालयाने ठाकरे सरकारला चांगलेच फटकारले आहे. सोशल मीडियावरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे(Chief Minister Uddhav Thackeray ) व आदित्य ठाकरे(Aditya Thackeray) यांच्याविषयी आक्षेपार्ह विधान करणाऱ्या एका महिलेवर गुन्हा दाखल झाला. हा गुन्हा रद्द करण्याची मागणी करत या महिलेनं उच्च न्यायालयात धाव घेतली होती. यावरील सुनावणी दरम्यान न्यायालयाने किती जणांवर अटकेची कारवाई करणार? असा सवालही न्यायालयाने उपस्थित केला.

सुनैना होले या महिलेने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्याबाबत समाजमाध्यमावरून आक्षेपार्ह वक्तव्य करत एक चित्रफीत प्रसिद्ध केली होती. यानंतर या महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. दाखल झालेला गुन्हा रद्द करावी अशी याचिका या महिलेने दाखल केली होती.

न्यायमूर्ती एस. एस. शिंदे आणि न्यायमूर्ती मकरंद कर्णिक यांच्या खंडपीठासमोर मंगळवारी या याचिकेवर सुनावणी झाली. होले यांनी सरकारच्या धोरणांबाबत केवळ तिचे मत व्यक्त केले आहे. राजकीय पक्ष, सरकार आणि सरकारी धोरणांवर समाजमाध्यमांवरून टीका करणाऱ्या व्यक्तींना तसे करण्यापासून रोखण्याची आवश्यकता असल्याचा युक्तीवाद सरकारी वकील वाय. पी. याज्ञिक यांनी न्यायालयासमोर केला.

“स्वत:च्या अभिव्यक्तिस्वातंत्र्याचा उपभोग घेताना इतरांच्या अभिव्यक्तिस्वातंत्र्याचे उल्लंघन होणार नाही याची काळजी घेणे आवश्यक आहे. मात्र, असे असले तरी लोकशाहीत सरकारी धोरणांवर होणाऱ्या टीकांचा सामना सरकारला करावा लागेल,” असं न्यायालयानं म्हटलं आहे. समाज आणि व्यक्तीचे मूलभूत अधिकार यात समतोल राखणे गरजेचे आहे. लोकशाहीत तो राखला गेला पाहिजे, असे नमूद करताना सरकार वा सरकारी धोरणांवर टीका करणाऱ्या प्रत्येकावर तुम्ही अटकेची कारवाई करणार का?  कितीजणांवर तुम्ही अशी कारवाई करणार अशी विचारणा न्यायालयाने केली.

या  महिलेवरील गुन्हा रद्द करावा की पोलिसांनी प्रकरणाचा तपास करेपर्यंत थांबावे, अशी विचारणा न्यायालयाने केली. तसेच सरकार आणि चंद्रचूड यांनी याबाबत गुरुवारी युक्तिवाद करण्याचे आदेश दिले आहेत.