संजय राऊत यांचं हे ट्विट कोणासाठी? चर्चेला उधाण; मराठी भाषेलाच दिली तिलांजली

शिवसेना नेते संजय राऊत यांनी एक ट्विट केलं आहे. त्यात ते म्हणतात लोक तुमची प्रतिमा मलिन करू शकतात. तुमच्या व्यक्तिमत्त्वावर चिखलफेक करू शकतात, परंतु ते तुमची चांगली कृत्ये काढून घेऊ शकत नाही कारण ते तुमचे वर्णन कसे करतात हे महत्त्वाचं नाही, तरीही जे तुम्हाला चांगलं ओळखतात त्यांचे तुम्ही कौतुकच कराल असा या ट्विटचा मतितार्थ आहे.

    मुंबई : मुकेश अंबानी यांच्या घराजवळ सापडलेल्या स्फोटकांप्रकरणी चहूबाजूंनी रान पेटलेले आहे. राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) रात्री उशीरा सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन वाझे यांना याप्रकणी अटक केली आहे. वाझे यांना अटक झाल्यानंतर विविध चर्चांना चांगलेच उधाण आले आहे. अशातच शिवसेना नेते संजय राऊत यांनी एक ट्विट केलं आहे. त्यात ते म्हणतात लोक तुमची प्रतिमा मलिन करू शकतात. तुमच्या व्यक्तिमत्त्वावर चिखलफेक करू शकतात, परंतु ते तुमची चांगली कृत्ये काढून घेऊ शकत नाही कारण ते तुमचे वर्णन कसे करतात हे महत्त्वाचं नाही, तरीही जे तुम्हाला चांगलं ओळखतात त्यांचे तुम्ही कौतुकच कराल असा या ट्विटचा मतितार्थ आहे.

    सचिन वाझे यांच्यावर ख्वाजा युनुस प्रकरणातही आरोप करण्यात आले होते. त्यावेळीही त्यांना अनेक दिव्यातून जावं लागलं होतं आणि आता या स्फोटक प्रकरणातही त्यांचा हात असल्याचा संशय व्यक्त होत असताना आज सकाळीच संजय राऊत यांनी हे ट्विट केलं आहे. बरं ट्विट केलं तर ते इंग्रजी भाषेत का केलं. मराठी भाषेचा कैवार घेणाऱ्या शिवसेनेने नेहमीच मराठी भाषेला प्राधान्य देण्यचा आग्रह धरला असताना संजय राऊत यांनी इंग्रजीत भाषेत ट्विट करण्याचं कारण काय?

    मागे एकदा सभागृहात बोलताना, दिवाकर रावते म्हणाले होते की, मेल्यानंतर बाळासाहेबांना काय उत्तर देऊ? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला होता. मग संजय राऊत यांना इंग्रजी भाषेत ट्विट करून नेमकं काय साधायचं आहे की, त्यांना एका पोलीस अधिकाऱ्यांची पाठराखण तर करायची नाही ना? असे विविध प्रश्नही या निमित्ताने उपस्थित करण्यात येत आहेत. आता शहाण्याने यातून नेमका काय अर्थ घ्यायचा हे ज्यांचं त्यालाच ठरवावं लागणार आहे एवढं मात्र नक्की.