मुंबई-पुणे महामार्ग कोणी विकला? निर्मला सीतारमण यांचा विरोधकांना सवाल

काँग्रेसने सत्तेच्या काळात रस्ते, रेल्वे, बंदरे, खाणी यांची विक्री केली आणि पैसा बनवला. याचा आधी त्यांनी जबाब द्यावा आणि मग मोदी सरकारवर टीका करावी, असा टोमणा त्यांनी हाणला. सामन्यांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न काँग्रेस करत आहे. त्याला जनता भुलणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. केंद्र सरकारच्या धोरणांवर टीका करण्यापूर्वी विरोधकांनी अभ्यास करावा, असा सल्लाही त्यांनी दिला.

  मुंबई : पायाभूत सुविधा क्षेत्रातील 6 लाख कोटी रुपयांच्या सरकारी संपत्ती खासगी क्षेत्राकडे सोपवण्याचा केंद्र सरकारच्या निर्णयावर विरोधकांनी केलेल्या आरोपांवर अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी गुरुवारी पलटवार केला. मुंबईत सीतारमण यांनी सार्वजनिक बँकाच्या कामाचा आढावा घेतला. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. मुंबई-पुणे महामार्ग(Mumbai Pune Expressway) कोणी विकला, नवी दिल्ली रेल्वे स्टेशनची विक्री कोणी केली याचा आधी जबाब द्या, असा सवाल त्यांनी विरोधकांना करीत काँग्रेस नेते राहुल गांधींनाही लक्ष्य केले.

  टीका करण्यापूर्वी विरोधकांनी अभ्यास करावा

  काँग्रेसने सत्तेच्या काळात रस्ते, रेल्वे, बंदरे, खाणी यांची विक्री केली आणि पैसा बनवला. याचा आधी त्यांनी जबाब द्यावा आणि मग मोदी सरकारवर टीका करावी, असा टोमणा त्यांनी हाणला. सामन्यांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न काँग्रेस करत आहे. त्याला जनता भुलणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. केंद्र सरकारच्या धोरणांवर टीका करण्यापूर्वी विरोधकांनी अभ्यास करावा, असा सल्लाही त्यांनी दिला.

  मलाई खाल्ली कोणी?

  मागील 70 वर्षात देशात निर्माण झालेल्या राष्ट्रीय मालमत्तेची केंद्र सरकारकडून विक्री केली जात असल्याची ओरड विरोधकांनी सुरु केली आहे. याचा सीतारमण यांनी समाचार घेतला. 70 वर्षात देशात जे उभे राहील, त्याचे कॉमनवेल्थ खेळांच्या वेळी काय झाले. संपत्ती निर्माण करताना तयार झालेली मलाई कोणी खाल्ली, असा सवाल सीतारमण यांनी केला. रेल्वे, ऊर्जा ते रस्त्यापर्यंत अनेक मूलभूत सेवा-सुविधांच्या क्षेत्रातील सरकारी संपत्तीची विक्री केली जाणार आहे. मात्र त्यांची मालक केंद्र सरकारकडेच कायम राहणार असल्याची ग्वाही सीतारमण यांनी दिली.

  मुंबई-पुणे हायवेची खासगी क्षेत्राला जवळपास 8000 कोटींना विक्री कोणत्या सरकारने केली? 2008 मध्ये दिल्ली रेल्वे स्टेशनचे खासगीकरण झाले. नवी दिल्ली रेल्वे स्टेशनच्या विक्रीचा प्रस्ताव कोणत्या सरकारने मागवले होते. नवी दिल्ली रेल्वे स्टेशनवर आता भावोजीची मालकी आहे ना?

  - निर्मला सीतारमण, केंद्रीय अर्थमंत्री