मोदी सुनसान बोगद्यात कोणाला दाखवत होते हात?, प्रकाश आंबेडकर यांचा सवाल

वंचित बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी टविट करत पंतप्रधान नरेद्र मोदींवर (Narendra modi) टीका केली आहे. ते म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी अटल बोगद्यात (Atal Tunnel) एकटेच असताना कोणाला पाहून हात हालवत मनोगत करत होते. तिथे सामान्य जनता उपस्थित नव्हती.

मुंंबई : जगातील सर्वात उंचीवर असलेल्या बोगद्याचे  ( Tunnel0  शनिवारी (दि.३ ऑक्टोबर २०२०) रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी (prime minister narendra modi) यांच्या हस्ते लोकार्पण झाले. अटल बोगदा रोहतांग असे या बोगद्याचे नामकरण करण्यात आले आहे. या अटल बोगदा बोगद्याचे लोकार्पण करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काहि अधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत या बोगद्याचे लोकार्पण झाले. यावेळी पंतप्रधान मोदी प्रसार माध्यमांच्या कॅमेऱ्याकडे पाहून हातवारे करुन नागरिकांना मनोगत करत होते. यावर वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी जोरदार टीका केली आहे.

वंचित बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी टविट करत पंतप्रधान नरेद्र मोदींवर (Narendra modi) टीका केली आहे. ते म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी अटल बोगद्यात (Atal Tunnel) एकटेच असताना कोणाला पाहून हात हालवत मनोगत करत होते. तिथे सामान्य जनता उपस्थित नव्हती. देशाची वाटचाल अनर्थाकडे होत आहे. याचा परिणाम पंतप्रधान मोदींच्या आरोग्यावर तर नाही झाला ना? जणतेला पंतप्रधानांच्या आरोग्याविषयी माहिती मिळाली पाहिजे. तसे या आधीही अशा प्रकारच्या हरकती पंतप्रधानांनी केल्या आहेत. असे प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे.

अटल टनेल ९ किलो मिटर लांबीचा आहे. २०१० पासून या बोगद्याचे काम सुरू आहे. बोगदा झाल्याने मनाली ते लेहचे अंतर ( Leh to Manali) जवळपास ४६ किलो मिटरने कमी होणार आहे. शिवाय मनाली आणि स्पीटी व्हॅलीला या बोगद्या मुळे वर्षभर जोडले जाणार आहे.

समुद्र सपाटीपासून तब्बल ३ हजार फुट उंचीवर हा बोगदा बनवण्यात आला आहे. दरम्यान या कार्यक्रमात संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, केंद्रीय अर्थ राज्यमंत्री अनुराग ठाकूर, हिमाचलचे मुख्यमंत्री जयराम ठाकूर उपस्थित रहाणार आहेत. पर्यटनाच्या दृष्टीनेही हा बोगद्याचे विशेष महत्व आहे.