आता नवीन वसुली मंत्री कोण होणार? चित्रा वाघ यांच्या प्रश्नावर राष्ट्रवादीचा जबरदस्त पलटवार

चित्राताईंचा नवरा स्वतः भ्रष्टाचाराच्या गुन्ह्यात अडकलेला आरोपी असून त्यांच्यावर रीतसर गुन्हा दाखल आहे आणि ताई विचारत आहेत नवीन वसुली मंत्री कोण? अहो ताई, भावनेच्या भरात इतकंही वाहून जाऊ नका की अंगलट आले की परत ‘पवार साहेब माझ्या वडिलांसारखेच आहेत'’ हे म्हणायची वेळ येईल. थोडा धीरज रखो, सब सच सामने आयेगा.!! असे रुपाली चाकणकर म्हणाल्या.

    मुंबई :  ‘आता नवीन वसुली मंत्री कोण होणार?’ असा प्रश्न अनिल देशमुख यांच्या राजीनाम्यानंतर विचारणाऱ्या भाजपच्या प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ यांच्यावर राष्ट्रवादी काँग्रेसने जोरदार हल्ला चढवला आहे. चित्राताईंचा स्वत:चा नवरा भ्रष्टाचाराच्या गुन्ह्यात अडकलेला आहे आणि त्या नवीन वसुली मंत्री कोण हे विचारत आहेत, असा सणसणीत टोमणा राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी हाणला आहे.

    चित्राताईंचा नवरा स्वतः भ्रष्टाचाराच्या गुन्ह्यात अडकलेला आरोपी असून त्यांच्यावर रीतसर गुन्हा दाखल आहे आणि ताई विचारत आहेत नवीन वसुली मंत्री कोण? अहो ताई, भावनेच्या भरात इतकंही वाहून जाऊ नका की अंगलट आले की परत ‘पवार साहेब माझ्या वडिलांसारखेच आहेत’’ हे म्हणायची वेळ येईल. थोडा धीरज रखो, सब सच सामने आयेगा.!! असे रुपाली चाकणकर म्हणाल्या.

    परमबीर सिंग यांनी केलेल्या 100 कोटींच्या वसुलीच्या आरोपांची सीबीआय चौकशी करण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयानं दिल्यानंतर काल अनिल देशमुख यांनी गृहमंत्रिपदाचा राजीनामा दिला. त्यांच्या राजीनाम्यानंतर विरोधकांनी सरकारवर टीकेचे बाण सोडले होते. चित्रा वाघ यांनीही ट्वीट करत निशाणा साधला होता. अखेर अनिल देशमुखांनी राजीनामा दिला आहे. आता प्रश्न आहे की नवीन वसुली मंत्री कोण होणार? चेहरे बदलल्यानं महाविकास आघाडी सरकारचा भ्रष्ट हेतू बदलणार नाही, असे वाघ यांनी म्हटले होते.