केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्यानं नाराज का?, पंकजा मुंडे काय म्हणाल्या? : वाचा सविस्तर

मी आणि प्रीतम मुंडे नाराज नाही. चुकीच्या बातम्या पेरल्या गेल्या. आम्ही कधीच मंत्रिपदाची मागणी केली नव्हती. भाजपच्या कोणत्याही निर्णयावर आम्हाला आक्षेप नाही, असं सांगत पंकजा मुंडे यांनी नाराजीच्या चर्चांना पूर्णविराम दिला.

    मुंबई : मंत्रिमंडळ विस्तारात प्रीतम मुंडे यांना केंद्रात मंत्रिपद न मिळाल्याने प्रीतम मुंडे यांच्यासह पंकजा मुंडेही नाराज असल्याच्या चर्चा सुरु आहेत. या चर्चा सुरू असतानाच भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी पत्रकार परिषद घेत यावर स्पष्टीकरण दिलं आहे.

    काय म्हणाल्या पंकजा मुंडे ?

    मी आणि प्रीतम मुंडे नाराज नाही. चुकीच्या बातम्या पेरल्या गेल्या. आम्ही कधीच मंत्रिपदाची मागणी केली नव्हती. भाजपच्या कोणत्याही निर्णयावर आम्हाला आक्षेप नाही, असं सांगत पंकजा मुंडे यांनी नाराजीच्या चर्चांना पूर्णविराम दिला. तसेच रात्री 12. 30 वाजता भागवत कराड यांचा फोन आला होता. मुख्यालयातून फोन आला होता आणि मी दिल्लीत दाखल झालो आहे अशी माहिती त्यांनी दिली होती, असं पंकजा मुंडे यांनी सांगितलंय. भाजपामध्ये एक पद्धत आहे, त्याचप्रमाणे निर्णय घेतले जातात. सगळ्या राज्यांच्या बाबतीत वेगवेगळे निर्णय झाले होते. फक्त प्रीतम मुंडे नाही तर हिना गावित यांचंही नाव चर्चेत होतं. नव्या लोकांना संधी देण्यास काही हरकत नाही, असं पंकजा मुंडे म्हणाल्या.

    तसेचं माझे लोकांशी नातं आहे, संबंध नाही. नातं कधीच तुटत नाही पण संबंध कडू गोड होत असतात. लोकांचं प्रेम असल्याने ते व्यक्त होत असतात, असं यावेळी त्या म्हणाल्या.