सचिन वाझे यांनी अंबानींच्या घराबाहेर स्फोटके ठेवण्याचा कट का रचला; एनआयए ने केलाय मोठा खुलासा

रिया चक्रवर्ती आणि तिचा भाऊ यांच्यासह सुमारे वीस जणांवर एनसीबीने ड्रग्जची खरेदी-विक्री प्रकरणात गुन्हा दाखल करत चौकशीनंतर शौविकला एनसीबीने ५ सप्टेंबर रोजी अटक केली होती. मात्र, त्यानंतर सुमारे तीन महिन्यांनंतर शौविकला एनडीपीएस न्यायालयाने जामीन मंजूर केला होता.

  मुंबई : ख्वाजा युनूस प्रकरणात निलंबित झाल्याने गेलेली प्रतिष्ठा परत मिळवण्यासाठी आणि स्वत:ची कार्यक्षमता सिद्ध करण्यासाठी सचिन वाझे (Sachin Vaze) यांनी मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटके ठेवण्याचा कट रचल्याचा खुलासा राष्ट्रीय तपास यंत्रणेने (NIA) केला आहे. गेल्या चार दिवसांपासून ‘एनआयए’कडून सचिन वाझे यांची चौकशी सुरु आहे. या चौकशीदरम्यान सचिन वाझे यांनी ‘एनआयए’ला बरीच माहिती दिली आहे.

  सचिन वाझे यांना पुन्हा प्रकाशझोतात यायचे होते. ख्वाजा युनूस प्रकरणामुळे पोलीस दलात गेलेली आपली पत पुन्हा मिळवायची होती असे वृत्त एका इंग्रजी दैनिकाने दिले आहे. त्यामुळे सचिन वाझे यांनीच मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर गाडी ठेवली. त्यानंतर या प्रकरणाचा यशस्वीपणे माग काढल्याचे श्रेय त्यांना मिळवायचे होते, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. मात्र, एनआयएला सचिन वाझे यांच्या थिअरीवर विश्वास नसल्याचेही समजते.

  नेमकं काय आहे प्रकरण?

  २ डिसेंबर २००२ मध्ये घाटकोपर येथे बसमध्ये बॉम्ब स्फोट झाले होते. या बॉम्बस्फोटात दोघांचा मृत्यू झाला होता तर ३९ लोक जखमी झाले होते. या प्रकरणी ख्वाजा युनूसला अटक करण्यात आली होती. २७ वर्षीय ख्वाजा युनूस हा परभणीचा रहिवासी होता. तो व्यवसायाने इंजिनिअर होता. दुबईत काम करत होता. त्याला पोटाही लावण्यात आला होता. ६ जानेवारी २००३ मध्ये युनूसची चौकशी करण्यात आली होती. त्यानंतर तो बेपत्ता झाल्याचं पोलिसांकडून सांगण्यात आलं होतं. युनूसची चौकशी करण्यासाठी त्याला औरंगाबादला नेण्यात येत होते. त्यावेळी तो फरार झाल्याचा पोलिसांनी दावा केला होता.

  निकाल काय लागला?

  न्यायालयाने युनूस प्रकरणाची सीआयडी मार्फत चौकशी करण्याचे आदेश दिले होते. त्यात युनूसचा पोलीस कोठडीत मृत्यू झाल्याचं उघड झालं होतं. युनूसला तुरुंगात कपडे काढून पट्ट्यांनी मारहाण केल्याचं एका साक्षीदाराने कोर्टाला सांगितलं होतं. या प्रकरणी एकूण १४ पोलीस कर्मचाऱ्यांना दोषी ठरवलं होतं. मात्र, खटला केवळ चार पोलीस अधिकाऱ्यांवर चालवण्यात आला होता. त्यात वाझेसह तीन कॉन्स्टेबलचा समावेश होता. या प्रकरणात त्यांना २००४ मध्ये निलंबितही करण्यात आले होते. २००७ मध्ये त्यांनी राजीनामा दिला, मात्र तपास सुरु असल्याने तो मंजूर करण्यात आला नव्हता. दरम्यान, २०१८ नंतर या प्रकरणावर कोर्टात कोणतीही सुनावणी झाली नाही.