राऊतांचे नाव घेऊन माझा दिवस का खराब करता? चंद्रकांत पाटील

भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर नव्हे तर शिवसेनेवर आमचा राग असल्याचे स्पष्ट केले आहे. अजित पवार आणि माझा काही बांधाला बांध नाही. त्यांचे आणि माझे वैयक्तिक वाद नाही. पण, ते जेव्हा माझ्या पक्षाबद्दल बोलतात तेव्हा मी उत्तर देणार. अजित पवार जेव्हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाबाबत बोलतात, आमच्या संस्थांबाबत बोलतात तेव्हा त्यांना उत्तर देणे भाग आहे. माझा आणि फडणवीसांचा राग सरकार पडले म्हणून अजित पवारांवर नाही. शिवसेनेने दगा दिल्यामुळे शिवसेनेवर आहे, असे पाटील म्हणाले.

  मुंबई : भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर नव्हे तर शिवसेनेवर आमचा राग असल्याचे स्पष्ट केले आहे. अजित पवार आणि माझा काही बांधाला बांध नाही. त्यांचे आणि माझे वैयक्तिक वाद नाही. पण, ते जेव्हा माझ्या पक्षाबद्दल बोलतात तेव्हा मी उत्तर देणार. अजित पवार जेव्हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाबाबत बोलतात, आमच्या संस्थांबाबत बोलतात तेव्हा त्यांना उत्तर देणे भाग आहे. माझा आणि फडणवीसांचा राग सरकार पडले म्हणून अजित पवारांवर नाही. शिवसेनेने दगा दिल्यामुळे शिवसेनेवर आहे, असे पाटील म्हणाले.

  चंद्रकांत पाटील यांना संजय राऊत यांच्या वक्तव्याबद्दल विचारले असता, ‘त्यांचे नाव घेऊन माझा दिवस का खराब करता?’ असा मिश्कील टोला त्यांनी लगावला. राऊत यांनी पुणे मनपाच्या सर्वच्या सर्व 280 जागा लढवाव्यात. आमच्या त्यांना शुभेच्छा आहेत, असे पाटील म्हणाले.

  उद्धव सरकारमध्ये प्रत्येक गोष्टीत संदिग्धता असते, क्लिअरिटी नाही. ठाकरे सरकारमध्ये कोरोनात किंवा मराठा आरक्षणमध्ये क्लिअरिटी नाही. सरकारमधील प्रत्येकाला प्रेस समोर बोलण्याची घाई झाली आहे.

  पहिली लाट ओसरल्यावर लसीकरण केंद्रांवर माणसे फिरकत नव्हती, दुसऱ्या लाटेत धावाधाव सुरु झाली, आता उत्पादन योग्य सुरू आहे. आता स्थिती सुधारत आहे. दरवेळी फक्त केंद्र-केंद्र करतात. तुम्हीही काहीतरी करा, अशा शब्दात पाटलांनी राज्य सरकारला सुनावले.

  राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार यांच्या ड्रॉवरमधून 54 आमदारांच्या स्वाक्षरीचे पत्र चोरणे हे नैतिक की अनैतिक आहे?, असा सवाल करणाऱ्या चंद्रकांत पाटलांना राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. दिल्लीतील चौकीदारचे लक्ष देशाच्या तिजोरीवर आणि गल्लीतल्या ठेकेदारचे लक्ष सिल्वर ओकच्या ड्रॉव्हरवर.

  करवीरच्या खजिन्यावर असाच डोळा असेल म्हणून करवीरकरांनी हाकलले, नंतर कोथरूड शोधावे लागले. नैतिकता विकणाऱ्यांनी नैतिकतेवर बोलल की लोकं चंपा म्हणतात, अशी जहरी मिटकरी यांनी केली. उल्लेखनीय आहे की, अजित पवारांनी शरद पवारांच्या ड्रॉव्हरमधून 54 आमदारांची यादी चोरून राज्यपालांना सादर केली हे कोणत्या नैतिकतेत बसते? तरीही ते शहाणपणा शिकवतात?, असा सवाल पाटील यांनी अजित पवारांना केला होता.

  हे सुद्धा वाचा