sambhaji raje - vadettivar

वडेट्टीवार यांच्या वक्तव्याविषयी सांगताना संभाजी राजे म्हणाले की, मराठा समाजाला आमचा विरोध नाही उलट तुम्ही ओबीसीमध्ये का येत नाही? जसा अ,ब,क,ड असे वर्ग आहेत तसा आणखी एक वर्ग वाढवू आणि तुम्ही वाढीव आरक्षण घ्या, असे वडेट्टीवर आपल्याला म्हणाल्याचे संभाजीराजे यांनी म्हटले आहे.

मुंबई : मराठा आरक्षणावरुन (Maratha Reservation) राज्यातील वातावरण कमालीचे तापलेले आहे. त्यामध्ये एखादा मराठा आरक्षणाविरोधातील शब्दही मोठा वादाचे कारण ठरत आहे. संभाजी राजे छत्रपती (Sambhaji Raje) यांनी मुलाखती दरम्यान वडेट्टीवर (Vadettiwar) यांच्या वक्तव्याबाबत मोठा गौप्यस्फोट केला आहे. संभाजी राजे म्हणाले की एका बैठकीदरम्यान मी आणि वडेट्टीवार एकत्र होतो. ऑफ द रेकॉर्ड ते मला एक गोष्ट म्हणाले. ती आता मी सर्वासमोर आणायला काही हरकत नाही.

वडेट्टीवार यांच्या वक्तव्याविषयी सांगताना संभाजी राजे म्हणाले की, मराठा समाजाला आमचा विरोध नाही उलट तुम्ही ओबीसीमध्ये का येत नाही? जसा अ,ब,क,ड असे वर्ग आहेत तसा आणखी एक वर्ग वाढवू आणि तुम्ही वाढीव आरक्षण घ्या, असे वडेट्टीवर आपल्याला म्हणाल्याचे संभाजीराजे यांनी म्हटले आहे.

तसेच हे खोटे असेल तर वडेट्टीवारांनी याबाबत स्पष्टीकरण द्यावे असेही राजेंनी म्हटले आहे. वडेट्टवीर जे तुम्ही बोललात ते तुमचे मोठे मन आहे. पण आपण अद्यापही सामाजिक मागास आहोत हे सिद्ध झाले आहे. एसईबीसी असे आपले आरक्षण आहे. आपण त्यावर लक्ष देऊ असे त्यांनी त्यावेळी सांगितल्याचे संभाजीराजे म्हणाले.

दरम्यान संभाजी राजे छत्रपती यांनी केलेल्या खुलासामुळे आता वादाला तोंड फुटले आहे. यामुळे राजकीय वर्तूळात चर्चांणा उधा आले आहे.