भाजप विरोधी पक्षाच्या नेत्यांनाच ईडीकडून नोटीस का? नाना पटोलेंचा सवाल

किरीट ज्याची तक्रार करतील त्यांच्यावर कारवाई करतात. गडबड केली असेल तर त्यांच्यावर कारवाई केली जावी, पण भाजपात असे कुणीच नाहीत का?'  असे म्हणत नाना पटोले यांनी भाजप नेत्यांवर निशाणा साधला.

    मुंबई (Mumbai) : महाविकास आघाडी सरकारच्या (the Mahavikas Aghadi government) नेत्यांना ईडीकडून (The Directorate of Enforcement–ED) नोटीस पाठवल्यामुळे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष (Congress state president) नाना पटोले (Nana Patole) यांनी प्रश्न उपस्थित केला आहे. भाजपविरोधी पक्षाच्या नेत्यांनाच ईडीच्या नोटासा का? असा नाना पटोले यांनी केला आहे.

    केंद्रीय मंत्री नारायण राणे (Union Minister Narayan Rane) यांच्या प्रकरणानंतर आता महाविकास आघाडी सरकारच्या नेत्यांना ईडीकडून नोटीसा पाठवण्याचे सत्र सुरू आहे. परिवहन मंत्री (Transport Minister) अनिल परब (Anil Parab) यांना ईडीने नोटीस (ED notice) पाठवल्यानंतर आता शिवसेना खासदार भावना गवळी (Shiv Sena MP Bhavana Gawli) यांच्या वाशीम (Washim) इथल्या मालमत्तांवर (the properties) ईडीची छापेमारी सुरू केली आहे.

    किरीट सोमय्या तक्रार करतील त्यांच्यावर कारवाई
    नाना पटोले म्हणाले, ‘मला भाजपला आणि ईडीला एक प्रश्न विचारायचा आहे.  भाजप विरोधी पक्षाच्या नेत्यांनाच ईडीच्या नोटीस दिल्या जात आहेत. चुकीचे केले असेल तर कारवाई झाली पाहिजे. पण भाजपतील सगळे दुधाने धुतलेले आहेत का? भाजपच्या लोकांवर कारवाई का होत नाही. असे पटोले म्हणाले.

    किरीट ज्याची तक्रार करतील त्यांच्यावर कारवाई करतात. गडबड केली असेल तर त्यांच्यावर कारवाई केली जावी, पण भाजपात असे कुणीच नाहीत का?’  असे म्हणत नाना पटोले यांनी भाजप नेत्यांवर निशाणा साधला. दरम्यान, सध्या शिवसेना खासदार भावना गवळी यांच्या वाशीम इथल्या मालमत्तांवर ईडीची छापेमारी सुरू केली आहे. तर अनिल परब मंगळवारी ईडी कार्यालयात चौकशीसाठी उपस्थित राहणार आहेत.