Manusakh Hiren Suicide? Manusakh Hiren's last mobile location found; Shocking twist in the case

सचिन वाझे यांनीच मनसुख यांची हत्या करण्यात आल्याचा आरोप मनसुख यांच्या पत्नीने केला आहे. तिन्ही दिवस मनसुख हे सचिन वाझे यांच्यासोबतच होते, असेही त्यांच्या पत्नीने जबाबात सांगितले आहे. या प्रकरणात पोलीस त्रास देत असल्याचे पत्र मनसुख यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिले होते. मनसुख यांची हत्या गाडीत करण्यात आली आणि त्यानंतर त्यांचा मृतदेह कळवा खाडीत फेकून देण्यात आला, असा आरोपही फडणवीस यांनी केला. मनसुख हत्येचे प्रकरणाचा तपास एटीएस आणि एनआयए करत आहे.

  मुंबई : प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घरासमोर सापडलेल्या विस्फोटकांच्या गाडीचे कथित मालक मनसुख हिरेन यांच्या मृत्यूप्रकरणी एटीएशने खळबळजनक खुलासे केले आहेत. मनसुख प्रकरणावरुन विधानसभेत प्रचंड गोंधळ झाला. या प्रकरणात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना लक्ष्य केले आहे.

  सचिन वाझे यांनीच मनसुख यांची हत्या करण्यात आल्याचा आरोप मनसुख यांच्या पत्नीने केला आहे. तिन्ही दिवस मनसुख हे सचिन वाझे यांच्यासोबतच होते, असेही त्यांच्या पत्नीने जबाबात सांगितले आहे. या प्रकरणात पोलीस त्रास देत असल्याचे पत्र मनसुख यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिले होते. अंबानी यांच्या घरासमोरील विस्फोटक गाडी प्रकरणी काही दिवस अटक होते असेही सचिन वाझे यांनी मनसुख यांना सांगितले असल्याचे जबाबात असल्याचे फडणवीसांनी सभागृहात सांगितले होते.

  या सर्व पुराव्यांच्या आधारावर सचिन वाझे यांना या प्रकरणात कलम २०१ अन्वये अटक का करण्यात येत नाही, सरकार त्यांना वाचविण्याचा प्रयत्न करीत आहेत का ? असा सवाल देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. मनसुख यांची हत्या गाडीत करण्यात आली आणि त्यानंतर त्यांचा मृतदेह कळवा खाडीत फेकून देण्यात आला, असा आरोपही फडणवीस यांनी केला. मनसुख हत्येचे प्रकरणाचा तपास एटीएस आणि एनआयए करत आहे.

  यावर सत्ताधाऱ्यांनी आक्षेप घेत, खासदार मोहन डेलकरांच्या आत्महत्येप्रकरणी कुणाला अटक का झाली नाही? त्यांच्या आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत असलेल्या सर्वांना अटक व्हायला हवी अशी मागणी करत परिवहनमंत्री अनिल परब आणि सत्ताधारी आमदारांनी गोँधळ घातला.

  यावर प्रत्युत्तर देत फडणवीसांनी डेलकर यांची आत्महत्येपूर्वीची चिठ्ठी दाखवत त्यात कुणाचेही नाव नसल्याचे सांगितले.
  यानंतर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये झालेल्या गोंधळानंतर सभागृहाचे कामकाज तहकूब करण्यात आले.