May God save Konkan from such fools Nitesh Rane criticizes Vinayak Raut

सुशांतसिंह राजपूत व दिशा सालियन आत्महत्या प्रकरणात भाजपनं अप्रत्यक्षपणे मुंबईतील एका तरुण मंत्र्यावर आरोप केले होते. त्यांचा रोख थेट पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्याकडं होता. यातूनच या प्रकरणांची चौकशी सीबीआयकडं देण्याची मागणी भाजपनं केली होती.

मुंबई :  महिला व बालकांवरील अत्याचारांच्या तक्रारींवर प्रभावीपणे कार्यवाही करण्यासाठी राज्यात ‘शक्ती’ नावाचे दोन कायदे करण्याचा निर्णय राज्यातील महाविकास आघाडी सरकारनं घेतला आहे. यावरून भाजपचे आमदार नीतेश राणे यांनी शिवसेनेला डिवचलं आहे. ट्विट करत त्यांनी राज्य मंत्रिमंडळातील तरुण मंत्र्यावर निशाणा साधला आहे.

‘महाराष्ट्र सरकार ‘शक्ती’ नावाचा कायदा आणत आहे हे ऐकून आनंद झाला. कायद्याचं नाव ‘दिशा’ ऐवजी ‘शक्ती’ का करण्यात आलं हे सांगण्याची गरज नाही. मात्र, या कायद्यांतर्गत कारवाई करताना निवडक प्रकरणांचा विचार होणार नाही अशी आशा आहे. प्रत्येक प्रकरणाला एकसमान न्याय द्यायला हवा, मग त्या प्रकरणात एखादा तरुण मंत्री संशयित असला तरी…’ असं नीतेश राणे यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

‘तो’ तरुण मंत्री कोण?

सुशांतसिंह राजपूत व दिशा सालियन आत्महत्या प्रकरणात भाजपनं अप्रत्यक्षपणे मुंबईतील एका तरुण मंत्र्यावर आरोप केले होते. त्यांचा रोख थेट पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्याकडं होता. यातूनच या प्रकरणांची चौकशी सीबीआयकडं देण्याची मागणी भाजपनं केली होती. दरम्यान, सुशांतसिंह राजपूत प्रकरण सीबीआयकडं सोपवण्यात आलं. मात्र, बॉलिवूडमधील ड्रग्ज कनेक्शन वगळता अद्याप या प्रकरणातून ठोस काहीच हाती आलेलं नाही. असं असलं तरी भाजपच्या काही नेत्यांकडून अधूनमधून आरोप सुरूच असतात. नीतेश राणे यांच्या ट्वीटचा रोखही आदित्य ठाकरे यांच्याकडंच असल्याचं बोललं जात आहे.