Akola girl killed her birth mother by hitting her head on a rock; The police were shocked to find out the reason behind the murder

शहरातील भायखळा परिसरात फूटपाथवर राहणाऱ्या पती-पत्नीमध्ये भांडण झाल्याने रागाच्या भरात पत्नीच्या डोक्यात दगड मारून तिला ठार मारणाऱ्या आरोपी पतीला केवळ १२ तासांच्या आत मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. राम किशोर यादव असे आरोपीचे नाव आहे. प्रकरणानंतर उत्तर प्रदेशात पळून जाण्याच्या तयारीत असताना पोलिसांनी अरोपीला अटक केली आहे.

    मुंबई : शहरातील भायखळा परिसरात फूटपाथवर राहणाऱ्या पती-पत्नीमध्ये भांडण झाल्याने रागाच्या भरात पत्नीच्या डोक्यात दगड मारून तिला ठार मारणाऱ्या आरोपी पतीला केवळ १२ तासांच्या आत मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. राम किशोर यादव असे आरोपीचे नाव आहे. प्रकरणानंतर उत्तर प्रदेशात पळून जाण्याच्या तयारीत असताना पोलिसांनी अरोपीला अटक केली आहे.

    १९ मे रोजी भायखळा पूर्व येथील संत सावता मार्गावरील फूटपाथवर राहणाऱ्या राम किशोर यादव याचे त्याच्या पत्नीसोबत भांडण झाले असता रागाच्या भरात त्याने एक दगड उचलून त्याच्या पत्नीच्या डोक्यात घातला. ही महिला गंभीर जखमी झाली होती. यानंतर आरोपी हा घटनास्थळाहून पसार झाला होता. पोलिसांना याची माहिती मिळताच महिलेस रुग्णालयात दाखल केले असता त्या ठिकाणी तिचा मृत्यू झाला.

    त्यानंतर घटनास्थळी कुठले सीसीटीव्ही फुटेज नसताना पोलिसांनी तांत्रिक तपास करत उत्तर प्रदेशला पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या राम यादव याला ताब्यात घेऊन त्याची चौकशी केली असता त्याने त्या महिलेचा खून केल्याची कबुली दिली आहे. अटक आरोपी हा फुटपाथवर राहणारा असून त्याचा मुंबईत कुठलाही कायमचा पत्ता नसतानाही पोलिसांनी आपले कौशल्य लावून आरोपीला अटक केली आहे. पोलिसांनी या संदर्भात ३०२ नुसार गुन्हा दाखल केलेला आहे.