नाल्यातील तरंगता गाळ काढायला अजून ४७ कोटींचे कंत्राट देणार? शेलार पुन्हा आक्रमक

107 टक्के नालेसफाई तर गाळात गेली. आता फ्लोटिंग म्हणजे तरंगता गाळ काढण्यासाठी 47 कोटीचं कंत्राट दिलं जात आहे. याचा अर्थ याआधी मुंबई महापालिका नाल्यातील रुतलेला गाळ, नाळ्याच्या वर दिसणारा गाळ, नाल्यावरील तरंगता गाळ काढण्यासाठी जे खर्च करत होते आणि कंत्राटदाराला मलिदा देत होते.

    मुंबई : मुंबईतील नाालेसफाईवरुन भाजप आणि शिवसेना नेत्यांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरु असल्याचं पाहायला मिळत आहे. आता पावसाळा सुरु झाला असतानाही नाल्यावरील तरंगता गाळ काढण्यासाठी कंत्राट देण्यात आलंय. त्यावरुन भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी आता हा तरंगता गाळ कुणाच्या खिशात जाणार? असा सवाल केलाय. यापूर्वीही आशिष शेलार यांनी मुंबई महापालिकेच्या नालेसफाईच्या दाव्याची पडताळणी करण्यासाठी मुंबईतील नाल्यांची पाहणी केली होती.

    107 टक्के नालेसफाई तर गाळात गेली. आता फ्लोटिंग म्हणजे तरंगता गाळ काढण्यासाठी 47 कोटीचं कंत्राट दिलं जात आहे. याचा अर्थ याआधी मुंबई महापालिका नाल्यातील रुतलेला गाळ, नाळ्याच्या वर दिसणारा गाळ, नाल्यावरील तरंगता गाळ काढण्यासाठी जे खर्च करत होते आणि कंत्राटदाराला मलिदा देत होते.

    त्यात अजून 47 कोटीची भर ही शिवसेनेची महापालिका टाकतेय. हा गाळ कुणाच्या खिशात चाललाय? गाळाच्या निमित्ताने कंत्राटदाराला मिळणाऱ्या मलिद्यातील वाटेकरी कोण आहेत? हे शिवसेनेनं स्पष्ट करावं, असा गंभीर आरोप आशिष शेलार यांनी मुंबई महापालिका अर्थात शिवसेनेवर केलाय.