Is Disha Patani allowed to break all the rules? Nitesh Rane criticizes Aditya Thackeray

पाच महिने अगोदर आम्ही संबंधित बँकेला पत्र दिले होते की आम्हाला हे कर्ज सेटलमेंट करायचे आहे. बँकेकडे ते पत्र आहे. मग आता अशा पद्धतीची नोटीस काढण्यात काही अर्थ नाही. दुसरा मुद्दा हा की आमचे हे कर्ज खाते मुंबईच्या बँकेत आहे. मग, पुणे पोलिसांनी हे सर्क्युलर का काढले? जर एखाद्या व्यक्तीला, कुटुंबाला लोन सेटलमेंट करायची असेल तर अशा पद्धतीची नोटीस काढण्यात काही अर्थच नाही. हा पूर्ण राजकारणाचा भाग आहे, असा आरोप आमदार नितेश राणे यांनी केला.

    मुंबई : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या पत्नी नीलम राणे आणि आमदार नितेश राणे यांच्याबद्दल पुणे पोलिसांच्या क्राईम गुन्हे शाखेकडून लूकआऊट सर्क्युलर काढण्यात आल्यानंतर आमदार नितेश राणे यांनी संतप्त सवाल करत ठाकरे सरकारवर जोरदार टिका केली आहे. हे कर्ज खाते मुंबईतील बँकेत आहे, मग पुणे पोलिसांनी लूकआऊट नोटीस का बजावली? पाच महिने आधी लोन सेटलमेंटसाठी बँकेला पत्र देऊनही आता ही नोटीस का बजावण्यात आली? असे प्रश्न विचारत नितेश राणें यांनी याबाबत न्यायालयात दाद मागणार असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली.

    पाच महिने अगोदर आम्ही संबंधित बँकेला पत्र दिले होते की आम्हाला हे कर्ज सेटलमेंट करायचे आहे. बँकेकडे ते पत्र आहे. मग आता अशा पद्धतीची नोटीस काढण्यात काही अर्थ नाही. दुसरा मुद्दा हा की आमचे हे कर्ज खाते मुंबईच्या बँकेत आहे. मग, पुणे पोलिसांनी हे सर्क्युलर का काढले? जर एखाद्या व्यक्तीला, कुटुंबाला लोन सेटलमेंट करायची असेल तर अशा पद्धतीची नोटीस काढण्यात काही अर्थच नाही. हा पूर्ण राजकारणाचा भाग आहे, असा आरोप आमदार नितेश राणे यांनी केला.

    हे लूकआऊट सर्क्युलर एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाला देण्यात आले आहे. सर्व विमानतळांना हे सर्क्युलर देण्यात आले आहे, आम्ही या विरोधात उच्च न्यायालयात दाद मागणार आहोत. याला काही अर्थ नाही. कारण जे कर्ज आम्हाला ५ महिन्यांपूर्वी भरायचे होते त्याची आता नोटीस काढून काही अर्थ नाही ना. ठाकरे सरकार आम्हाला घाबरले आहे, अशा पद्धतीने पत्र आणि नोटीस काढत बसले आहेत असे राणे म्हणाले.

    लूकआऊट नोटीस काढायचीच असेल तर मी यांना मुद्दे देतो. नंदकिशोर चतुर्वेदी नावाचा व्यक्ती गेल्या चार महिन्यांपासून गायब आहे. त्याचे आणि मंत्री आदित्य ठाकरे यांचे व्यावसायिक संबंध आहेत. मग आता लूकआऊट नोटीस काढायची असेल तर आदित्य ठाकरेंबाबत काढायला हवी, की नंदकिशोर चतुर्वेदी कुठे आहे? माझ्याकडे कागदपत्र आहेत. २०१९ पर्यंत आदित्य ठाकरे आणि ते एका कंपनीत पार्टनर होते. अशा व्यक्तीबद्दल तुम्ही लूकआऊट नोटीस काढा, असे थेट आव्हानच नितेश राणे यांनी ठाकरे सरकारला दिले.

    ते म्हणाले की, अंगावर आले तर शिंगावर घेतल्याशिवाय आम्ही राहणार नाही. यांची अनेक प्रकरणे आमच्याकडे आहेत. आता हात घातला आहे ना, मग गणपतीमध्ये नाचत बसा आता. त्यांना वाटते की असल्या गोष्टी केल्यावर हे घाबरतील. पण त्यांनी एक प्रकरण काढले तर आम्ही त्यांची दोन प्रकरणे काढू. मी काही दिवसांत पत्रकार परिषद घेतो, असा इशाराच नितेश राणे यांनी ठाकरेंना दिला.