महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि मुखमंत्री उद्धव ठाकरे
महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि मुखमंत्री उद्धव ठाकरे

या अधिवेशनात मराठा आरक्षणावरुन विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये चांगलीच खडाजंगी झाली. दरम्यान, ओबीसी समाजाच्या आरक्षणाला कोणताही धक्का न लावता मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवला जाणार असल्याची ग्वाही सरकारने अधिवेशनात दिली. 

मुंबई : राज्य विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनाची मंगळवारी सांगता झाली. हे दोन दिवसीय अधिवेशनात मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच गाजला. मराठा आरक्षणावरुन विरोधकांनी महाविकास आघाडी सरकारला चांगलेच धारेवर धरले.

मराठा आरक्षणाच्या बाबतीत सरकार गोंधळलेल्या अवस्थेत आहे अशी टीका विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी केली. मुख्यमंत्र्यांनी ओबीसी आरक्षणाच्या संदर्भात भूमिका मांडली. त्यांचे म्हणणे हे आहे की विरोधक ओबीसी आरक्षणाबाबत काही गोष्टी पसरवत आहेत. मात्र, आम्ही हे त्यांना सांगू इच्छितो की सत्ता पक्षातील मंत्रीच या गोष्टी पसरवत आहेत. त्यांचेच आमदार पत्रही देत आहेत. त्यामुळे अशा मंत्र्यांवर आणि ओबीसी समाजात संभ्रम निर्माण करणाऱ्यांवर मुख्यमंत्री कारवाई करणार का? असा प्रश्न देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केला.