घोटाळेबाजांना एक्सपोज करत राहणार; किरीट सोमय्यांकडे मंत्री आणि नेत्यांची यादीच तयार

नारायण राणेंविरोधात ठाकरे सरकारने केलेल्या कारवाईला आम्ही घाबरत नाही. घोटाळेबाजांना एक्सपोज करतच राहणार. अनिल देशमुख, प्रताप सरनाईक, मिलिंद नार्वेकर नंतर आत्ता अनिल परब, भावना गवळी, महापौर किशोरी पेडणेकर, जितेंद्र आव्हाड यांच्यावरही करवाई होणारच असा इशारा सोमय्या यांनी दिला आहे.

    मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे  यांच्या बद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणारे केंद्रीय मंत्री नारायण राणे  यांना अखेर संगमेश्वर पोलीसानी ताब्यात घेतले आहे. नारायण राणेंविरुद्ध नाशिक, पुणे, रायगड अशा विविध ठिकाणी गुन्हे दाखल झाले आहेत. राणेंवरील कारवाईमुळे भाजप शिवसेनेमधील वाद चांगलाच चिघळला आहे. मुंबईसह राज्यभरात तणावाचे वातावरण आहे. या सर्व प्रकारावर भाजप नेते किरीट सोमय्या यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे.

    नारायण राणेंविरोधात ठाकरे सरकारने केलेल्या कारवाईला आम्ही घाबरत नाही. घोटाळेबाजांना एक्सपोज करतच राहणार. अनिल देशमुख, प्रताप सरनाईक, मिलिंद नार्वेकर नंतर आत्ता अनिल परब, भावना गवळी, महापौर किशोरी पेडणेकर, जितेंद्र आव्हाड यांच्यावरही करवाई होणारच असा इशारा सोमय्या यांनी दिला आहे.

    केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या वादग्रस्त वक्तव्याचे पडसाद आज मुंबईत उमटले. युवा सेना आणि शिवसेना आज मुंबईत आक्रमक झाली हाेती. राणे यांच्या वक्तव्याच्या निषेधार्थ युवा सेनेने आज राणे यांच्या बंगल्यावर सकाळी निषेध माेर्चा काढला. शिवसैनिकांनी आपला संताप आज व्यक्त केला. सकाळी तब्बल दीड तास जुहू येथील राणे यांच्या निवासस्थाच्या परिसरात भाजप आणि युवा सेनेचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले हाेते.

    किरीट सोमय्या यांची प्रतिक्रिया – पाहा व्हिडिओ

    read_also content=”मुंबईतील कोरोना घालविण्यासाठी BMC चा जबरदस्त प्लान; नागरिकांचा बॉडी मास इंडेक्स तपासला जाणार~https://www.navarashtra.com/mumbai-news-marathi/corporation-to-conduct-survey-of-non-communicable-diseases-in-mumbai-citizens-body-mass-index-will-be-checked-nrvk-171732/”]