बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे
बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे

बलात्काराच्या आरोपामुळे आरोपांमुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी भाजपकडून होत आहे. लवकरात लवकर निर्णय घेऊ असे म्हणत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी धनंजय मुंडेंचे टेन्शन वाढवले आहे. धनंजय मुंडे स्वत: राजीनामा देणार की राष्ट्रवादी पक्ष त्यांना राजीनामा द्यायला सांगणार? अशी चर्चा आता सुरु झाली आहे.

मुंबई : बलात्काराच्या आरोपामुळे आरोपांमुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी भाजपकडून होत आहे. लवकरात लवकर निर्णय घेऊ असे म्हणत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी धनंजय मुंडेंचे टेन्शन वाढवले आहे. धनंजय मुंडे स्वत: राजीनामा देणार की राष्ट्रवादी पक्ष त्यांना राजीनामा द्यायला सांगणार? अशी चर्चा आता सुरु झाली आहे.

धनंजय मुंडे यांनी सिल्व्हर ओक या शरद पवार यांच्या निवासस्थानी जावून त्यांची भेट घेतली होती. त्यावर पवार यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. मुंडे यांच्यावरचे आरोप गंभीर आहेत, असे शरद पवार म्हणाले. धनंजय मुंडे यांनी माझी भेट घेतली आणि संपूर्ण प्रकरणाची माहिती दिली.

मुंडे यांनीही या प्रकरणावर स्पष्टीकरण दिले आहे, धनंजय मुंडे यांनी मला दिलेली माहिती मी पक्षासमोर मांडेन, संघटनेच्या प्रमुख नेत्यांना विश्वासात घेऊन आणि चर्चा करून लवकरच याबाबत निर्णय घेऊ, असेही शरद पवार म्हणाले. धनंजय मुंडेंवरील आरोपांचं स्वरुप गंभीर आहे, आणि त्याबाबत मुख्यमंत्र्यांच्या निर्णयाची वाट पाहावी लागणार नाही. जे काही निर्णय घ्यावे लागतील, ते आम्हीच तातडीने घेऊ असंही शरद पवार म्हणालेत.

धनंजय मुंडे यांच्याबाबतीत प्रथम पक्ष पातळीवर निर्णय घेवून मुख्यमंत्री उद्ध ठाकरे यांना कळवले जाणार असल्याचे शरद पवारांनी स्पष्ट केले. राजीनाम्याबाबत शरद पवार आणि पक्षातील मोठे नेते विचार करुन निर्णय घेतील असे धनंजय मुंडे म्हणाले.

धनंजय मुंडेंनी सर्वकाही पक्षश्रेष्ठींवर सोपवले असले तरी ते स्वत: राजीनामा देऊ शकतात अशी अशी चर्चा सुरु आहे. किंवा त्यांनी स्वत: राजीनामा न दिल्यास पक्ष त्यांच्याकडे राजीनामा मागू शकतो.