CBI नंतर ED देखील धाड टाकणार? अनिल देशमुख आणखी अडचणीत येणार

राज्याचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख यांच्या विरोधात सीबीआयने गुन्हा दाखल केला आहे. यानंतर देशमुख यांचा ज्ञानेश्वरी बंगला आणि अन्य १० ठिकाणी सीबीआयने छापेही मारले. १०० कोटींच्या कथित वसुली प्रकरणी ही कारवाई करण्यात आली. यापूर्वी देशमुख यांची सीबीआयने ११ तास चौकशी केली होती. त्या चौकशीच्या आधारावर सीबीआयने एक अहवाल तयार केला आहे. हा अहवाल सीबीआयने अद्याप कोर्टात सादर केलेला नाही. मात्र, अहवाल सादर करण्यापूर्वीच देशमुखांविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. त्यातच आता ईडी देखील देशमुखांच्या मालमत्तेवर धाड टाकणार असल्याची महिती सुत्रांकडून मिळाली आहे. तब्बल १०० कोटींचा आरोप असल्याने ईडी देखील यात हस्तक्षेप करणार असल्याचे सुत्रांचे म्हणणे आहे. त्यामुळे देशमुख यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

    मुंबई : राज्याचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख यांच्या विरोधात सीबीआयने गुन्हा दाखल केला आहे. यानंतर देशमुख यांचा ज्ञानेश्वरी बंगला आणि अन्य १० ठिकाणी सीबीआयने छापेही मारले. १०० कोटींच्या कथित वसुली प्रकरणी ही कारवाई करण्यात आली. यापूर्वी देशमुख यांची सीबीआयने ११ तास चौकशी केली होती. त्या चौकशीच्या आधारावर सीबीआयने एक अहवाल तयार केला आहे. हा अहवाल सीबीआयने अद्याप कोर्टात सादर केलेला नाही. मात्र, अहवाल सादर करण्यापूर्वीच देशमुखांविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. त्यातच आता ईडी देखील देशमुखांच्या मालमत्तेवर धाड टाकणार असल्याची महिती सुत्रांकडून मिळाली आहे. तब्बल १०० कोटींचा आरोप असल्याने ईडी देखील यात हस्तक्षेप करणार असल्याचे सुत्रांचे म्हणणे आहे. त्यामुळे देशमुख यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

    देशमुखांच्या घरासह १० ठिकाणी झाडाझडती

    सीबीआयने शनिवारी देशमुखांच्या घर आणि कार्यालयासह १० ठिकाणी छापे मारले आहेत. सीबीआयने देशमुखांचा मुंबईतील ज्ञानेश्वरी बंगला, मुबंईतीलच वरळीतील सुखदा सोसायटीतील कार्यालय आणि नागपुरातील घरासह १० पेक्षा अधिक ठिकाणी छापे मारले. सद्यस्थितीत अनिल देशमुख नागुपारतील घरी गेल्या तीन दिवसांपासून वास्तव्यास आहेत. तेथेच सीबीआयचे पथकही उपस्थित आहे. रात्री उशिरा सीबीआय पथकाने छापेमारी केली. ज्ञानेश्वरी बंगल्यातील सीसीटीव्ही फुटेजही सीबीआयने ताब्यात घेतले असल्याची माहिती सूत्रांनी दिली. देशमुखांच्या सचिवाच्या घराचीही सीबीआयने झाडाझडती घेतली असल्याचे समजते. या सर्व ठिकाणी पोलिस बंदोबस्तही तैनात करण्यात आला आहे. सीबीआय पथकाने पीपीई कीट परिधान करूनच कारवाई केली.

    १५ दिवस केली चौकशी

    न्यायालयाने सीबीआयला १०० कोटी वसुलींच्या आरोपाची चौकशी करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर सीबीआयने एसपी संजय पाटील, याचिकाकर्त्या जयश्री पाटील, निलंबित सहायक पोलिस निरीक्षक सचिन वाझे, मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांचीही सीबीआयने चौकशी केली आहे. त्यानंतर देशमुख यांचीही कसून चौकशी करण्यात आली होती. त्यानंतर सीबीआयने हे पाऊल उचलले आहे.