लघु मध्यम उद्योगांसाठी उद्योग परिषद स्थापन करणार; उद्योग मंत्री सुभाष देसाईंची घोषणा

राज्यातील लघु मध्यम उद्योगांना त्यांच्या अडी अडचणी सोडविण्यासाठी लघु व मध्यम उद्योग परिषद स्थापन केली जाईल अशी घोषणा उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी केली. रोहित पवार यांनी यांवेळी रिझर्व बँकेने राज्यातील लघु उद्योगांना परिषद स्थापन करून राज्य सरकारने मदत करावी असा प्रस्ताव मांडला आहे त्याची अंमलबजावणी केली आहे का असा प्रश्न केला. त्यावर उत्र देताना देसाई म्हणाले की, याबाबत राज्य सरकार लवकरच कार्यवाही करेल.

    मुंबई : राज्यातील लघु मध्यम उद्योगांना त्यांच्या अडी अडचणी सोडविण्यासाठी लघु व मध्यम उद्योग परिषद स्थापन केली जाईल अशी घोषणा उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी केली. राज्यात उद्योगांना पायाभूत सुविधा देण्याबाबत विधानसभेत सदा सरवणकर आणि अन्य सदस्यांच्या तारांकीत प्रश्नावर ते उत्तर देत होते.

    या प्रश्नाच्या चर्चेत भाग घेताना भाजपचे अतुल भातखळकर यांनी बजाज यांच्या  उद्योगासाठी पुणे जिल्ह्यात जमीन सवलतीच्या दरात देवूनही त्यांनी गेल्या १६ वर्षापासून उद्योग उभारला नाही, त्यासाठी एमआयडीसीने त्यांना दंडासह १३४ कोटी रूपयांची आकारणी केली असतान ती सरकारने वसुल का केली नाही असा सवाल केला.

    पर्यटनमंत्री अदित्य ठाकरे यांच्याशी बैठक झाल्यानंतर दंडाची रक्कम कमी करण्यात आल्याचा आरोप भातखळकर यांनी केला. त्यावर उत्तर देताना देसाई म्हणाले की, या बाबत बजाज यांच्या कडून खुलासा आल आणि त्यांनी न्यायालयात धाव घेतली त्यात न्यायालयाने दिलेल्या निदर्धेशानुसार त्यांच्याशी चर्चा करुन नव्याने आकारणी करण्यात आली असून त्यांच्याकडून काही प्रमाणात दंड वसुल केला जाणार आहे.

    रोहित पवार यांनी यांवेळी रिझर्व बँकेने राज्यातील लघु उद्योगांना परिषद स्थापन करून राज्य सरकारने मदत करावी असा प्रस्ताव मांडला आहे त्याची अंमलबजावणी केली आहे का असा प्रश्न केला. त्यावर उत्र देताना देसाई म्हणाले की, याबाबत राज्य सरकार लवकरच कार्यवाही करेल. छोट्या उद्योजकांना मदत करण्याचे सरकारचे धोरणअसून ओद्योगिक वसाहतीमध्ये या छोट्या उद्योगांना तयार गाळे देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे.