sanjay raut

मुंबई : मुंबईची ओळख असलेली फिल्मसिटी (mumbai film city) उत्तर प्रदेशला हलवण्याची चर्चेवरुन चांगलाच वाद रंगला. उत्तर प्रदेशचे (uttar pradesh) मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (yogi adityanath mumbai visit) यासाठी मुंबईत दाखल झाले आहेत. यावर मुंबईतील राजकारण चांगलेच तापले आहे. विविध पक्षांचे नेते यावर आपली प्रतिक्रिया देत आहेत. शिवसेना नेते संजय राऊत यांनी देखील आपली प्रतिक्रिया दिली आहे.

फिल्म इंडस्ट्री जशी मुंबईत आहे तशी तेलंगणा, आंध्रा, कर्नाटक, केरळ, प.बंगालमध्ये देखील आहे. मग योगी आदित्यनाथ तिथंही जाऊन अभिनेते, निर्मात्यांशी बोलणार का? त्यांनाही यूपीत घेऊन जाणार का? की त्यांचा पंगा फक्त मुंबई आणि महाराष्ट्राशी आहे असा सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे. काँग्रेस नेते आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavhan), संजय राऊत यांनी देखील यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे.

देशातील सर्वात मोठी फिल्मसिटी उत्तर प्रदेशात बनवणार असं वक्तव्य उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (cm yogi adityanath) केले होते. त्याअनुषंगाने ते मुंबईत दाखल झाले आहेत. अनेक बॉलिवूड सेलिब्रेटींची ( Bollywood celebrities) योगी भेट घेत आहेत.