Will petrol-diesel become cheaper? What will the Mahavikas Aghadi government give to the people due to the mountain of debt and decline in revenue?

महाराष्ट्र विधिमंडळात सोमवारी राज्याचा अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे. अर्थमंत्री अजित पवार विधानसभेत अर्थसंकल्प मांडतील. कर्जाचा डोंगर आणि महसूली उत्पन्नात घट यातून महाविकास आघाडी सरकार महाराष्ट्रातील जनतेला काय देणार? पेट्रोल-डिझेल स्वस्त होणार का? असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

  मुंबई : महाराष्ट्र विधिमंडळात सोमवारी राज्याचा अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे. अर्थमंत्री अजित पवार विधानसभेत अर्थसंकल्प मांडतील. कर्जाचा डोंगर आणि महसूली उत्पन्नात घट यातून महाविकास आघाडी सरकार महाराष्ट्रातील जनतेला काय देणार? पेट्रोल-डिझेल स्वस्त होणार का? असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

  कोरोना संकटामुळे अर्थसंकल्पीय अधिवेशन 8 दिवसांचेच ठेवण्यात आले आहे. गेल्या आठवड्यात विरोधकांनी विविध मुद्यांवरून सरकारची चांगलीच कोंडी केली होती. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, सुधीर मुनगंटीवार यांनी विदर्भ वैधानिक मंडळाची फेररचना, ओबीसी आरक्षण यासह मनसूख हिरेन यांच्या संशयास्पद मृत्यूवरून आक्रमक पवित्रा घेत सरकारवर जोरदार हल्लाबोल केला.

  एकंदरीत, अधिवेशनाचा पहिला आठवडा वादळी ठरला. उर्वरित तीन दिवसात अर्थसंकल्प मंजूर करून घेण्याचे आव्हान सरकारसमोर आहे. अर्थसंकल्पात राज्य सरकार पेट्रोलवरील करात घट करणार असल्याची शक्यता वर्तविली जात आहे. या अर्थसंकल्पातून राज्यातील जनतेला काय मिळेल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

  काय असेल अर्थसंकल्पात?

  • आरोग्याच्या सुविधांवर भर देतानाच नवनवीन उत्पन्नाचे स्त्रोत शोधण्यावर भर
  • नवनवीन पायाभूत सुविधा प्रकल्पांची निर्मिती
  • इंधनावरील सेस कमी करण्याची महत्वाची घोषणा होण्याची शक्यता
  • पेट्रोल, डिझेलच्या दरात लिटरमागे १ रूपये ते २ रूपये युनिट सेस कमी करण्याची घोषणा होण्याची शक्यता