राज-उद्धव एकत्र येणार का?, संजय राऊतांचं मोठं वक्तव्य, काय म्हणाले ? : वाचा सविस्तर

जो परमेश्वरावर विसंबून राजकारण करतो त्याला स्वत: परमेश्वरही मदत करत नाही. राजकारण हे आपलं आपण करायचं असतं, असं म्हणत संजय राऊत यांनी राज ठाकरेंवर निशाणा साधला. संजय राऊत यांच्या या टीकेला ‘मनसेकडून काय प्रत्युत्तर देण्यात येणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

    मुंबई : काही दिवसांपूर्वी एका मुलाखतीत राज ठाकरे यांना भविष्यात शिवसेना-मनसे एकत्र येणार का, असा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर राज ठाकरे यांनी ‘परमेश्वराला ठाऊक, असं उत्तर दिलं होतं. यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं होतं. आता यावर शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. परमेश्वर हा कुठल्याही पक्षाचा मेंबर नसतो, तो कधीच मध्यस्थाची भूमिका घेत नाही. त्यामुळे अशा गोष्टी या परमेश्वरावर सोडून द्यायच्या नसतात, असं संजय राऊत म्हणाले. ते मुंबईमध्ये माध्यमांशी बोलत होते.

    दरम्यान जो परमेश्वरावर विसंबून राजकारण करतो त्याला स्वत: परमेश्वरही मदत करत नाही. राजकारण हे आपलं आपण करायचं असतं, असं म्हणत संजय राऊत यांनी राज ठाकरेंवर निशाणा साधला. संजय राऊत यांच्या या टीकेला ‘मनसेकडून काय प्रत्युत्तर देण्यात येणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

    मुलाखतीत राज ठाकरेंना प्रश्न ?

    तुम्ही दोन्ही भाऊ एकत्र येणार का?, असा प्रश्न राज ठाकरे यांना विचारण्यात आला. त्यावर राज ठाकरे यांनी दोन्ही हात आकाशाकडे दाखवत ‘परमेश्वरालाच ठाऊक’ असं उत्तर दिलं. त्यावर तुम्ही परमेश्वराला मानता का? असा सवाल करण्यात आला. तेव्हा, म्हणजे काय? परमेश्वराला मानतो म्हणूनच परमेश्वरालाच ठाऊक असं म्हणालो.