मुंबई: चला चला राणीच्या बागेत फिरायला चला…  राणी बाग लवकरच पर्यटकांसाठी खुली होणार? BMC तयारीला लागली

मुंबईकरांसह पर्यटकांच्या आकर्षणाचे स्थान असलेल्या वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान आणि प्राणीसंग्रहालय अर्थीत राणी बाग (Mumbai Rani Baug ) बंद असलेले दरवाजे लवकरच पर्यटकांसाठी खुले होण्याची शक्यता आहे. राज्य सरकार, पालिकेकडून त्याप्रकारे आदेश येताच पर्यटकांना त्यांच्या आवडत्या बागेत पुन्हा एकदा मनमुराद फेरफटका करता येणार आहे.

  मुंबई : मुंबईकरांसह पर्यटकांच्या आकर्षणाचे स्थान असलेल्या वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान आणि प्राणीसंग्रहालय अर्थीत राणी बाग (Mumbai Rani Baug ) बंद असलेले दरवाजे लवकरच पर्यटकांसाठी खुले होण्याची शक्यता आहे. राज्य सरकार, पालिकेकडून त्याप्रकारे आदेश येताच पर्यटकांना त्यांच्या आवडत्या बागेत पुन्हा एकदा मनमुराद फेरफटका करता येणार आहे.

  पर्यटकांना तिथली जैविक विविधता, वाघ-बिबळ्या-अस्वल-पेंग्विन आदी वन्यजीवांना पाहण्याची संधी नव्याने मिळण्याची शक्यता आहे. सध्या राणी बागेत पर्यटकांना प्रवेश नाही. मात्र, त्याप्रकारचा निर्णय झाल्यास ऐनवेळी धावपळ नको म्हणून प्रशासनाकडून पूर्वतयारी सुरू झाली आहे.
  कोरोनाच्या पहिल्या लाटेत राणी बागेत पर्यटकांना प्रवेश बंद करण्यात आला.

  पहिली लाट ओसरल्यानंतर कोरोना नियंत्रणात येत असल्याचे पाहून सार्वजनिक उद्याने, बागा आदींकडे पर्यटकांना प्रवेश देण्यास सुरुवात झाली. तेव्हा, फेब्रुवारीमध्ये राणी बाग पर्यटकांना खुली झाली आणि तिथे पर्यटकांनी चांगलीच गर्दी केली. मात्र, कोरोना रुग्णांची संख्या वाढल्यानंतर सर्वच सार्वजनिक ठिकाणांकडे प्रवेशबंदी जाहीर झाली. त्यानंतर पर्यटकांना राणी बागेत जाण्यास मिळालेले नाही.

  गर्दी होणार नाही, याची दक्षता घेतली जाणार

  सध्या, कोरोनाची दुसरी लाट ओसरल्यानंतर कोरोना रुग्ण संख्या नियंत्रणात आहे. तेव्हा, राज्य सरकार, पालिकेने अनेक ठिकाणचे निर्बंध शिथील केले आहेत. त्या पार्श्वभूमीवर राणी बागेसह अन्य निर्बंध असलेल्या सार्वजनिक ठिकाणी पर्यटकांना प्रवेश देण्याचा निर्णय होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. तसा निर्णय झाल्यास पर्यटकांच्या अनुषंगाने राणी बागेत पूर्वतयारी सुरू झाली आहे. त्यात निर्जंतुकीकरणासह अन्य उपाय योजले जात आहेत. पर्यटकांना प्रवेश दिल्यास कुठेही गर्दी होणार नाही, याचीही दक्षता घेतली जाणार आहे.

  राणी बागेत पर्यटकांना प्रवेश दिल्यास कोरोनाचे सर्व नियम पाळले जाण्यावर विशेष लक्ष दिले जाईल. त्यात कोणतीही कमतरता राहणार नाही, हे पाहिले जाईल. यापूर्वीही प्रशासनाने तशी उत्तम व्यवस्था, नियोजन केले होते.

  -डॉ. संयज त्रिपाठी, संचालक, राणी बाग उद्यान