sanjay raut and sambhaji bhide

संजय राऊत यांनी शुक्रवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी संभाजी भिडे यांना चिमटा काढला. यापूर्वी मी छत्रपती घराण्यासंदर्भात विधानं केलं होतं तेव्हा संभाजी भिडे यांनी आंदोलन छेडलं होतं. त्यामुळे आता मी त्यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न करत आहे. आताही ते सातारा, सांगली आणि कोल्हापूर बंद करणार का, हे मी त्यांना विचारेन. म्हणजे आम्हालाही भूमिका घेता येईल, अशी खोचक टिप्पणी संजय राऊत यांनी केली.

मुंबई : प्रकाश आंबेडकर यांनी छत्रपती (Chhatrapati) घराण्याच्या वंशजांसदर्भात केलेले वक्तव्य हे त्यांच्या समर्थकांना आणि महाराष्ट्राला पटणारे नाही. मलाही हे वक्तव्य पटलेले नाही. परंतु, माझ्याकडून अशाप्रकारचं विधान झालं होतं तेव्हा संभाजी भिडे (Sambhaji Bhide) यांनी आंदोलनाची हाक दिली होती. मग तेच संभाजी भिडे आता प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांच्याविरोधात आंदोलन करणार का, असा सवाल शिवसेना खासदार संजय राऊत ( Sanjay Raut) यांनी उपस्थित केला.

संजय राऊत यांनी शुक्रवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी संभाजी भिडे यांना चिमटा काढला. यापूर्वी मी छत्रपती घराण्यासंदर्भात विधानं केलं होतं तेव्हा संभाजी भिडे यांनी आंदोलन छेडलं होतं. त्यामुळे आता मी त्यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न करत आहे. आताही ते सातारा, सांगली आणि कोल्हापूर बंद करणार का, हे मी त्यांना विचारेन. म्हणजे आम्हालाही भूमिका घेता येईल, अशी खोचक टिप्पणी संजय राऊत यांनी केली. त्यामुळे आता संभाजी भिडे या टीकेला प्रत्युत्तर देणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

काय म्हणाले होते प्रकाश आंबेडकर?

प्रकाश आंबेडकर यांनी मराठा समाजाच्या आंदोलनाला आपला पाठिंबा असल्याचे जाहीर केले होते. मात्र, मराठा आरक्षणासंदर्भात उदयनराजे भोसले आणि छत्रपती संभाजीराजे यांनी घेतलेल्या भूमिकेवर त्यांनी टीकास्त्र सोडले होते. ‘एक राजा तर बिनडोक आहे. असं मी म्हणेन, दुसरे संभाजीराजे आहेत, त्यांनी भूमिका घेतली हे बरोबर आहे. पण ते आरक्षणापेक्षा इतर गोष्टींवर भर देत असल्याचे प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले होते.