दहावी वेबसाईट क्रॅश प्रकरणाची खरंच चाैकशी हाेईल? दाेषींवर कारवाई करण्यास वरिष्ठ अधिकाऱ्यांची टाळाटाळ

ऐन निकालाच्यावेळी शुक्रवारी दहावीची वेबसाईट क्रॅश झाली, तब्बल पाच तास वेबसाईट क्रॅश हाेती. यामुळे विद्यार्थ्यांना निकाल पाहता आला नाही शिवाय वेबसाईटच्या गाेंधळामुळे विद्यार्थ्यांचे टेंशन वाढले. तांत्रिक कारणामुळे वेबसाईट क्रॅश झाल्याचे कारण मंडळाच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले, शिवाय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी शुक्रवारी संध्याकाळी ट्विट करत दिलगिरी व्यक्त केली व दाेषींवर कारवाई हाेईल असे सांगण्यात आले.

    मुंबई: शुक्रवारी दहावीचा निकाल दुपारी एक वाजता जाहीर झाला. पण नेमकी त्याचवेळी मंडळाची वेबसाईट क्रॅश झाली. तब्बल पाच तास ही वेबसाईट क्रॅश हाेती, यामुळे राज्यभरातील ला‌खाे विद्यार्थ्यांना आपला निकाल पाहता आला नाही. वेबसाईट बंद असल्याने व विद्यार्थ्यांना झालेल्या त्रासाबाबत दस्तुरखुद्द शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी ट्विट करुन दिलगिरी व्यक्त केली व याबाबत दाेषी असलेल्या व्यक्तींवर कारवाईचे आदेश दिले. पण, याबाबत आम्ही काेणतीही कारवाई करणार नाही अथवा चाैकशीसाठी ही उत्सुक नसल्याचे एका वरिष्ठ अधिकाऱ्यांने खासगीत सांगितले. यामुळे वेबसाईट क्रॅश प्रकरणात खराेखर कारवाई हाेईल का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. तर या प्रकरणी नेमके काेणाला अभय दिले जात आहे? असा प्रश्नही निर्माण झाला आहे.

    ऐन निकालाच्यावेळी शुक्रवारी दहावीची वेबसाईट क्रॅश झाली, तब्बल पाच तास वेबसाईट क्रॅश हाेती. यामुळे विद्यार्थ्यांना निकाल पाहता आला नाही शिवाय वेबसाईटच्या गाेंधळामुळे विद्यार्थ्यांचे टेंशन वाढले. तांत्रिक कारणामुळे वेबसाईट क्रॅश झाल्याचे कारण मंडळाच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले, शिवाय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी शुक्रवारी संध्याकाळी ट्विट करत दिलगिरी व्यक्त केली व दाेषींवर कारवाई हाेईल असे सांगण्यात आले.

    पण याबाबत मंडळाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने खासगीत सांगितले की, याबाबत आम्ही काेणतीही कारवाई करणार नाही व चाैकशीही केली जाणार नाही. यामुळे नक्की दाेषींवर कारवाई हाेणार का? विद्यार्थ्यांना झालेल्या नाहक त्रासाला जबाबदार काेण? पालक याबाबत काही निर्णय घेणार का? असे प्रश्न मात्र गुलदस्त्यातच आहेत.