Will the general public be allowed to travel locally in the New Year? Indications given by Minister Vadettiwar

पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी म्हटले आहे की, मागील १५ दिवसांत मुंबईत कोरोना परिस्थिती आटोक्यात आहे. बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रामाण वाढले आहे तर कोरोना बाधित रुग्णांची नोंदही कमी झाली आहे. त्यामुळे नवीन वर्षात सर्वसामान्यांना लोकल प्रवास करण्याची परवनागी देण्याच्या निर्णयावर विचार सुरु आहे.

मुंबई : गेल्या अनेक महिन्यांपासून मुंबईकरांना एकच प्रश्न सतावतो आहे. ते म्हणजे सर्वसामान्यांचा लोकल प्रवास कधी सुरु होणार? अत्यावश्यक सेवेती कर्मचाऱ्यांना लोकल प्रवासाची परवानगी राज्यसरकारने दिली आहे. परंतु कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वसामान्य लोकांना लोकलप्रवासाची परवानगी नाकारण्यात आली आहे. परंतु कोरोना परिस्थिती नियंत्रणात आल्यामुळे सर्वसामान्यांना लोकल प्रवास करण्याची परवनगी लवकरच देण्यात येईल. यावर विचार सुरु आहे. अशी माहिती पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे. राज्यात कोरोना परिस्थिती नियंत्रणात आल्यावर लोकल प्रवास सुरु करण्यास कोणताही अडथळा नाही असे वडेट्टीवार यांनी म्हटले आहे.

पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी म्हटले आहे की, मागील १५ दिवसांत मुंबईत कोरोना परिस्थिती आटोक्यात आहे. बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रामाण वाढले आहे तर कोरोना बाधित रुग्णांची नोंदही कमी झाली आहे. त्यामुळे नवीन वर्षात सर्वसामान्यांना लोकल प्रवास करण्याची परवनागी देण्याच्या निर्णयावर विचार सुरु आहे. त्यामुळे हा निर्णय लवकरच होईल असा विश्वास आहे.

कोरोनामुळे मागील ८ महिन्यांपासून सर्वसामान्य लोकांसाठी लोकलप्रवासास बंदी आहे. परंतु अत्यावश्य सेवेतील कर्मचाऱ्यांना लोकल प्रवासाला परवनगी आहे. कोरोना परिस्थिती नियंत्रणात आल्यावर नियमांत शिथिलता देत महिलांना लोकल प्रवासाची परवनगी देण्यात आली आहे. सकाळी ११ ते ३ आणि संध्याकाळी ७ ते शेवटच्या लोकलपर्यंत महिलांना प्रवासाची मुभा आहे.