‘पॅरासीटमल ,ऍस्प्रिन टॅबलेटवर येणार बंदी; याचे उत्पादन निरुपयाेगी चाचणीत आले समोर

ऍस्प्रिन कॅप्सूल तसेच पॅरासीटमल टॅब्लेटसची गुणवत्ता प्रमाणित नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे या औषधांचे उत्पादन तसेच विक्रीवर प्रश्न निर्माण झाला आहे. सेंट्रल ड्रग्स स्टॅंडर्ड कंट्रोल ऑर्गनाझेशनच्या मुंबई विभागाने केलेल्या गुणवत्ता चाचणीत ही बाब नुकतीच समाेर आली आहे.

मुंबई: ऍस्प्रिन कॅप्सूल तसेच पॅरासीटमल टॅब्लेटसची गुणवत्ता प्रमाणित नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे या औषधांचे उत्पादन तसेच विक्रीवर प्रश्न निर्माण झाला आहे. सेंट्रल ड्रग्स स्टॅंडर्ड कंट्रोल ऑर्गनाझेशनच्या मुंबई विभागाने केलेल्या गुणवत्ता चाचणीत ही बाब नुकतीच समाेर आली आहे.
सीडीएससीओ च्या मुंबई पश्चिम विभागाने रसलोय एएसपी १०/७५ (रोझावास्टीन अँड एस्प्रिन कॅप्सूल , पॅरासीटमल टॅब्लेटस आयपी ५०० एमजी , हेबस ५० (अकर्ब्स टॅब्लेटस ५०० एमजी) या तीन टॅब्लेटस ‘नॉट ऑफ स्टॅंडर्ड क्वालिटी’ नोंदवण्यात आले आहे. ही औषध निरीक्षणात अपेक्षेप्रमाणे गुणकारी नसल्याचे सिद्ध झाल्याने या औषधांच्या उत्पादन आणि विक्रीवर बंदी येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
पॅरासीटमल , ऍस्प्रिन टॅबलेट निरुपयाेगी ?

एस्प्रिन कॅप्सूल , B. No.: १९ISGC040 Mfg हे मेसर्स सायनोकेम ,हरिद्वार उत्तराखंड कंपनीचे उत्पादन आहे. पॅरासीटमल टॅब्लेटस आयपी ५०० एमजी , B. No.: २५१९०७ Mfg हे मेसर्स गोवा अँटीबायोटिक्स अँड फार्मसिटीकल या कंपनीचे उत्पादन आहे. हेबस ५० (अकर्ब्स टॅब्लेटस ५०० एमजी) B. No.: MT190814 हे मेसर्स मस्कत हेल्थ सर्व्हिस लिमिटेड हरिद्वार उत्तराखंड या कंपनीचे उत्पादन आहे.
सेंट्रल ड्रग्स स्टॅंडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशनने नोव्हेंबर मध्ये ७४६ टॅब्लेटसची गुणवत्ता तपासली. त्यातील १४ टॅब्लेटस गुणवत्तापूर्ण नसल्याचे समोर आले आहे. त्यातील तीन टॅब्लेट्सची गुणवत्ता सीडीएससीओ च्या मुंबई विभागाने तपासली आहे. एस्प्रिन कॅप्सूल तपासाठी वापरली जाते , हिबस ५० ही डाएटसाठी तर रोझावास्टीन टॅब्लेटस मधुमेहासाठी वापरली जाते.

सीडीएससीओ तपासणीत ही औषध कुचकामी ठरली आहेत. या औषधांच्या वापराबाबत लवकर निर्णय घेणे आवश्यक आहे. या औषधांचा रुग्णाच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अभय पांडे , राष्ट्रीय अध्यक्ष , ऑल फूड अँड ड्रग्स लायसेन्स होल्डर फाउंडेशन