remple

शिवसेना नेते संजय राऊत यांच्याकडे विचारणा केली असता लवकरच राज्यातील मंदिरे खुली करण्यात येतील, असे संकेत त्यांनी दिले आहेत. हॉटेल्स, बार सुरु करता मग मंदिरे का नाही याबाबत त्यांच्याकडे विचारणा केली असता, ‘हॉटेल्स ५०, ६० टक्के खुली करता येतात, मंदिरांचे तसे करता येत नाही.

मुंबई : कोरोनाचा प्रादुर्भाव (Corona Virus) रोखण्यासाठी करण्यात आलेल्या लॉकडाऊनमध्ये (Lockdown) प्रार्थनास्थळे बंद करण्याच्या निर्णयाला आता सहा महिन्यांच्यावर कालावधी उलटून गेला आहे. गेल्या दोन महिन्यांपासून सुरु असलेल्या मिशन बिगिन अगेन म्हणजेच अनलॉकच्या घोषणेत रस्ते वाहतूक, एसटी प्रवास आता तर हॉटेल, रेस्टॉरंट, बारही सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे आता राज्यातील मंदिरे, मशिदी यासह पार्थनास्थळे सुरु करावीत, अशी मागणी जोर धरते आहे.

याबाबत शिवसेना नेते संजय राऊत यांच्याकडे विचारणा केली असता लवकरच राज्यातील मंदिरे खुली करण्यात येतील, असे संकेत त्यांनी दिले आहेत. हॉटेल्स, बार सुरु करता मग मंदिरे का नाही याबाबत त्यांच्याकडे विचारणा केली असता, ‘हॉटेल्स ५०, ६० टक्के खुली करता येतात, मंदिरांचे तसे करता येत नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे लवकरच याबाबत सकारात्मक निर्णय घेतील’ असे वक्तव्य राऊत यांनी केले आहे.

राज्यातील तीर्थस्थळांचे आर्थिक गणित गेल्या सहा महिन्यापासून कोलमडलेले आहे. मंदिरे बंद असल्याने राज्यभरातून येणाऱ्या भाविकांची संख्या रोडावल्याने, या धार्मिक पर्यटनावर जगणाऱ्यांच्या रोजी-रोटीचा प्रश्न गंभीर झाला आहे. गणेशोत्सव साधेपणाने साजरा केल्यानंतर आता नवरात्रौत्सवही साधे पणाने साजरा करण्याच्या सूचना सरकारकडून देण्यात आल्या आहेत. नवरात्रौत्सवात तरी मंदिरे खुली करावीत, अशी मागणी जोर धरते आहे.