The slums are corona-free; There is no restricted area in 18 wards

सध्या मुंबईत ४२ लाख लोकांनी कोरोना प्रतिबंधित लसीचे दोन्ही डोस घेतले असून ८२ लाख नागरिकांनी लसीचा पहिला डोस घेतला असल्याची माहिती सोमवारी बृहन्मुंबई महानगरपालिकेने मुंबई उच्च न्यायालयात सादर केली. तसेच मुंबईत कोरोनाची तिसरी लाट(Corona Third wave in Mumbai) येण्याची शक्यता कमी असल्याचा दावाही यावेळी पालिकेच्यावतीने कऱण्यात आला. त्याची दखल घेत खंडपीठाने पालिकेच्या मोहिमेवर समाधान व्यक्त करत याचिका निकाली काढली.

    मुंबई : सध्या मुंबईत ४२ लाख लोकांनी कोरोना प्रतिबंधित लसीचे दोन्ही डोस घेतले असून ८२ लाख नागरिकांनी लसीचा पहिला डोस घेतला असल्याची माहिती सोमवारी बृहन्मुंबई महानगरपालिकेने मुंबई उच्च न्यायालयात सादर केली. तसेच मुंबईत कोरोनाची तिसरी लाट(Corona Third wave in Mumbai) येण्याची शक्यता कमी असल्याचा दावाही यावेळी पालिकेच्यावतीने कऱण्यात आला. त्याची दखल घेत खंडपीठाने पालिकेच्या मोहिमेवर समाधान व्यक्त करत याचिका निकाली काढली.

    कोरोनाच्या वाढत्या रुग्ण संख्येच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने सुरू केलेल्या लसीकरण मोहिमेचा लाभ हा सर्वसाधारणपणे ७५ वर्ष पूर्ण झालेल्या वृद्ध आणि दिव्यांग तसेच अंथरुणावर खिळलेल्या ज्येष्ठ नागरिकांना घेता येत नाही म्हणून त्यांना घरोघरी जाऊन लस देण्यात यावी, अशी मागणी करत अॅड. धृती कपाडिया आणि अॅड. कुणाल तिवारी यांनी या वर्षाच्या सुरुवातीला जनहित याचिका दाखल केली होती. त्यांनतर ऑगस्ट महिन्यापासून मुंबईत घरोघरी जाऊन अंथरुणांवर खिळलेल्या आणि ज्येष्ठ नागरिकांचे लसीकऱण करण्यास सुरुवात झाली. त्या याचिकेवर सोमवारी मुख्य न्या. दीपांकर दत्ता आणि न्या. गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठासमोर सुनावणी पार पडली.

    तेव्हा, मुंबईत कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता कमी असल्याचा दावा मुंबई महानगर पालिकेच्यावतीने एड. अनिल साखरे यांनी केला. तसेच मुंबईत सध्या सर्व ठिकाणी लसीकरणाचे काम सुरळीत सुरू आहे. कुठेही लसीची कमतरता नाही. मुंबईतील ४२ लाख लोकांचे लसीकऱण पूर्ण झाले असून ८२ लाख नागरिकांनी पहिला डोस घेतला असल्याची माहितीही साखरे यांनी खंडपीठाला दिली. तसेच अंथरुणाला खिळलेल्या २,५८६ लोकांना आतापर्यंत कोरोना प्रतिबंधित लसींचे दोन्ही डोस दिले असून ३,९४२ नागरिकांना पहिला डोस देण्यात आला असल्याची माहितीही साखरे यांनी खंडपीठाला दिली.

    तसेच महाराष्ट्रातही कोविड -१९ परिस्थिती नियंत्रणात आहे कारण गेल्या काही महिन्यांपासून दैनंदिन प्रकरणे कमी होत आहेत. त्यामुळे सदर याचिका निकाली काढावी, अशी मागणीही साखरे यांनी खंडपीठाने केली. त्याबाबत खंडपीठाने याचिकाकर्त्यांना विचारणा केली असता त्यांनीही त्यास सहमती दर्शवली. तेव्हा, मुंबईतील नागरिक कोरोना प्रतिबंधित लसीपासून वंचित नाहीत तसेच पालिकेने राबविलेल्या मोहिमेवर समाधान व्यक्त करत खंडपीठाने याचिका निकाली काढली.

    सुनावणीदरम्यान मुंबईत घडलेल्या बनावट लसीकरण घोटाळ्यात प्रकऱणी दाखल कऱण्यात आलेल्या १० एफआयआर पैकी ९ एफआय़आरमध्ये पोलिसांकडून तपास पूर्ण झाला असून पोलिसांनी न्यायालयाता आऱोपपत्र दाखल केले असल्याची माहिती राज्य सरकारच्यावतीने खंडपीठाला देण्यात आली.