ऑक्टोबर महिन्यात कोरोनाची तिसरी लाट धडकणार? मुंबईतील ४५० गणेशभक्त मदतीला धावून येणार

सप्टेंबर महिन्यातील शेवटच्या आठवड्यात किंवा ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात कोरोनाची तिसरी लाट धडकण्याचा इशारा संशोधकांनी आणि तज्ज्ञांनी दिला आहे. त्यातच या महिन्यात गणपतीचे देखील आगमन होणार आहे, मात्र हा गणेशोत्सव साजरा करत, गरजूंच्या मदतीलाही मुंबईतील ४५० गणेशभक्त धावून जाणार आहेत.

    मुंबई : जागतिक आरोग्य संघटना आणि जगभरातील तज्ज्ञांनी कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा इशारा दिला आहे. तसेच केंद्राने आणि नीती आयोगाने याबाबत प्रत्येक राज्याला परिपत्रक जारी करत, कोरोनाच्या तिसऱ्या लाटेबद्द्ल सतर्क राहण्याच्या सूचना दिला आहेत. त्यामुळं कोरोनाची तिसरी लाट सप्टेंबर अखेर किंवा ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात येईल असं तज्ज्ञांनी म्हटले आहे. यामुळं लोकांच्या मनात तिसऱ्या लाटेबद्दल भीती आहे. मुंबई महानगरपालिका आणि राज्य सरकारने कंबर कसली असताना, मुंबईतील विविध गणेश मंडळातील ४५० कार्यकर्ते देखील तिसऱ्या लाटेला सामोरं जाण्यासाठी कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत लोकांना मदत करण्यासाठी पुढे सरसावले आहेत.

    गेल्या दीड वर्षांपासून मुंबईत सुरू असलेल्या कोरोनाविरोधातील लढ्यात सगळेच उतरले आहेत. डॉक्टर, नर्सेस, सफाई कर्मचारी, आरोग्यसेविका तसेच आरोग्य सेवकांसोबत सामान्य नागरिक देखील कोरोनाच्या लढ्यात उतरला आहे. असं असताना, आता विविध गणेश मंडळातील सुमारे ४५० कार्यकर्त्यांनी देखील पुढाकार घेतला आहे. अशी माहिती बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीचे नरेश दहीबावकर यांनी दिली आहे.

    सप्टेंबर महिन्यातील शेवटच्या आठवड्यात किंवा ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात कोरोनाची तिसरी लाट धडकण्याचा इशारा संशोधकांनी आणि तज्ज्ञांनी दिला आहे. त्यातच या महिन्यात गणपतीचे देखील आगमन होणार आहे, मात्र हा गणेशोत्सव साजरा करत, गरजूंच्या मदतीलाही मुंबईतील ४५० गणेशभक्त धावून जाणार आहेत.

    रुग्णवाहिनी उपलब्ध करुन देणे, ऑक्सिजन उपलब्ध करुन देणे, रुग्णासांठी बेड उपलब्ध करुन देणे, रुग्णांना रुग्णालयापर्यंत पोहोचवणे, खाद्यपदार्थ पुरवणे, तसेच कोरोना संकटात जी काही मदत लागेल, ती पुरवण्यासाठी ४५० गणेशभक्तांनी कंबर कसली आहे, त्यामुळं आगामी काळात जरी कोरोनाची तिसरी लाट आली तरी, तिला आम्ही सामोरं जाण्यास तयार आहोत, असे बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीचे नरेश दहीबावकर यांनी सांगितले.

    read_also content=”मुंबईतील कोरोना घालविण्यासाठी BMC चा जबरदस्त प्लान; नागरिकांचा बॉडी मास इंडेक्स तपासला जाणार~https://www.navarashtra.com/mumbai-news-marathi/corporation-to-conduct-survey-of-non-communicable-diseases-in-mumbai-citizens-body-mass-index-will-be-checked-nrvk-171732/”]