दहावीच्या परीक्षा होणार की नाही? मुंबई उच्च न्यायालयातील सुनावणीत नेमकं काय घडलं?

राज्य सरकारचा दहावी परीक्षेबाबतचा निर्णय रद्द ठरवावा, अशी मागणी त्यांनी केली. (Bombay High Court) मुख्य न्यायधीश दीपांकर दत्ता आणि न्यायमूर्ती एजी कुलकर्णी यांच्या समोरील आजची सुनावणी संपली आहे. याप्रकरणी पुढील सुनावणी गुरुवार म्हणजेच 3 जून रोजी होणार आहे. 

    मुंबई: केंद्रीय शिक्षण मंत्रालयानं सीबीएसई बोर्डाच्या दहावीच्या परीक्षा रद्द केल्यानंतर राज्य सरकारनं देखील दहावीच्या परीक्षा रद्द (Maharashtra SSC Exam) करण्याचा निर्णय जाहीर केला. महाराष्ट्र सरकारच्या (Maharashtra Government) या निर्णयास पुणे येथील निवृत्त प्राध्यापक धनंजय कुलकर्णी (Dhananjay Kulkarni) यांनी जनहित याचिकेद्वारे आव्हान दिलं.

    राज्य सरकारचा दहावी परीक्षेबाबतचा निर्णय रद्द ठरवावा, अशी मागणी त्यांनी केली. (Bombay High Court) मुख्य न्यायधीश दीपांकर दत्ता आणि न्यायमूर्ती एजी कुलकर्णी यांच्या समोरील आजची सुनावणी संपली आहे. याप्रकरणी पुढील सुनावणी गुरुवार म्हणजेच 3 जून रोजी होणार आहे.

    याचिकाकर्त्यांना नवा अहवाल सादर करण्याचे आदेश

    दहावीच्या परीक्षेसंदर्भातील राज्य सरकारचा निर्णय कायम ठेवावा या मागणीसाठी उच्च न्यायालयात इंटर्व्हेन्शन याचिका दाखल झाल्या आहेत. दोन वेगवेगळ्या हस्तक्षेप याचिका दाखल झाल्यानं निर्णय देण्यास हायकोर्टानं नकार दिला. एकच याचिका फक्त परीक्षा घ्या या बाजूची, जी धनंजय कुलकर्णी यांनी दाखल केली होती.

    दहावीतील एक विद्यार्थी आणि दोन पालकांचा परीक्षेस नकार देणारी याचिका दाखल झाली आहे. सरकारने काढलेल्या निर्णयाला जोडून न्यायालयात अहवाल सादर करा, असं याचिकाकर्ते धनंजय कुलकर्णींना कोर्टानं सांगितलं आहे.