कंटेन्टमेंट झोनची कडक अंमलबजावणी; BMC ने दिला कडक इशारा

मुंबईत गेल्या अकरा महिन्यांपासून कोरोना संसर्गाशी लढा सुरु आहे. रुग्ण संख्या आटोक्यात आला असताना महिनाभरापासून पुन्हा रुग्ण संख्या वाढत आहेत. त्यावर मुंबई शहरचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी मुंबईत अंशत: लॉकडाऊन लावावा लागेल असे म्हटले आहे. यावर पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी बोलताना म्हणाले की, मुंबईत जे रुग्ण आढळून येत आहेत ते इमारतीमधील रुग्ण आहेत. आणि ते विखुरलेले आहेत.

    मुंबई : मुंबईत गेल्या महिनाभरात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. मात्र चाचण्यांच्या प्रमाणात पॉझिटिव्ह येणाऱ्या रुग्णाचे प्रमाण कमी आहे. यामुळे सध्या तरी लॉकडाऊनचा विचार नाही. मात्र मुंबईकरांनी नियम पाळले नाहीत, नागरिकांनी सहकार्य केले नाही, आणि रुग्णसंख्या अशीच वाढत राहिली तर मात्र अंशत: लॉकडाऊनचा विचार करण्यात येईल, असा इशारा मुंबई महापालिकेने दिला आहे. मुंबईकरांनी कोरोनाच्या त्रिसूत्रीची अंमलबजावणी करण्याचे आवाहन मुंबई महापालिकेने केले आहे.

    मुंबईत गेल्या अकरा महिन्यांपासून कोरोना संसर्गाशी लढा सुरु आहे. रुग्ण संख्या आटोक्यात आला असताना महिनाभरापासून पुन्हा रुग्ण संख्या वाढत आहेत. त्यावर मुंबई शहरचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी मुंबईत अंशत: लॉकडाऊन लावावा लागेल असे म्हटले आहे. यावर पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी बोलताना म्हणाले की, मुंबईत जे रुग्ण आढळून येत आहेत ते इमारतीमधील रुग्ण आहेत. आणि ते विखुरलेले आहेत.

    एकाच ठिकाणी रुग्ण आढळून येण्याचे प्रमाण कमी आहे. इतर शहरांच्या तुलनेत मुंबईत चाचण्या वाढवण्यात आल्या आहेत. चाचण्यांच्या प्रमाणात पॉझिटिव्ह येणाऱ्या रुग्णांचे प्रमाण कमी आहे. सध्या जे रुग्ण आढळून येत आहेत त्यापैकी ९७ टक्के रुग्ण हे लक्षणे नसलेले आहेत. मुंबईमधील कोविड सेंटरमधील ६० टक्के खाटा रिक्त आहेत. त्यात व्हेंटिलेटर्स, आयसीयू उपलब्ध आहेत. ही व्यवस्था पुरेशी आहे, असे ते म्हणाले.

    रुग्ण आढळून येणाऱ्या विभागात इमारती आणि चाळी सील केल्या आहेत. एकाच ठिकाणी रुग्णसंख्या वाढली तर कंटेन्टमेंट झोनची कडक अंमलबजावणी केली जाईल. त्यासाठी पालिकेने तयारी ठेवली असल्याचे महापालिका अतिरिक्त आयुक्त सुरेश काकणी यांनी सांगीतले.